‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केलाय. 'देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच', असं फडणवीस म्हणाले.

'देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 8:53 PM

मुंबई : कर्नाटकमधील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कर्नाटकातील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केलाय. ‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच’, असं फडणवीस म्हणाले.

‘आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच!’ असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.

बोम्मई यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुतळा विटंबनेच्या घटनेवर भाष्य करताना ‘रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही’, असं वक्तव्य केलं. बोम्मई यांच्या या वक्तव्याचाही शिवसेनेकडून निषेध व्यक्त केला जातोय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इतर बातम्या :

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.