Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस

आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असं विधान फडणवीस यांनी केल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (devendra fadnavis reaction on one year of his swearing ceremony)

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 12:34 PM

औरंगाबाद: भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असं विधान फडणवीस यांनी केल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (devendra fadnavis reaction on one year of his swearing ceremony)

औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक विधान केलं आहे. ठाकरे सरकार हे बेईमानी करून आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं सूचक विधान करतानाच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असं ते म्हणाले. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरं सरकार देऊ, असं विधानही त्यांनी केलं आहे.

कालच भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्ताबदल होईल, असं विधान केलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी आज हे सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याआधीही दिवाळीनंतर राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचा दावा करून भाजप नेते नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांकडूनच सत्ताबदलाचे संकेत दिले जात असल्याने राज्यात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कराची बेकरीच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी शिवसेनेला सुनावले आहे. कराची बेकरी बाबत त्यांनी त्यांच्या लोकांना सांगावं. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवतो. कराची पुन्हा भारताचा भाग होईल याबाबत आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांवर वाचलेली कविता पाहता, अश्या लोकांनी बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील काही कोविड सेंटर बंद असतील. पण वेळ आली तर हे कोविड सेंटर पुन्हा सुरू करता आलं पाहिजे, असं ते म्हणाले.

पंकजा नाराज नाहीत

यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं. ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात, असं ते म्हणाले. (devendra fadnavis reaction on one year of his swearing ceremony)

संबंधित बातम्या:

शपथविधीला 1 वर्ष पूर्ण, अमावस्येचा फेरा, विरोधकांच्या डोक्यावर परिणाम, संजय राऊतांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस-अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण!, ते सरकार अल्पजीवी का ठरलं?

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…

(devendra fadnavis reaction on one year of his swearing ceremony)

'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.