Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा निर्णय, फडणवीसांकडून पहिल्यांदाच स्वागत, द्रौपदी मुर्मूंबद्दलचा निर्णय नव्या अध्यायाची सुरुवात?

Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कृषिपंपाचा मार्च 2022 पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात आला पाहिजे. कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौर ऊर्जेला प्राधान्य देत, मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या 6 महिन्यात पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा निर्णय, फडणवीसांकडून पहिल्यांदाच स्वागत, द्रौपदी मुर्मूंबद्दलचा निर्णय नव्या अध्यायाची सुरुवात?
ज्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, ते अडथळे निर्माण करतायत, बंठिया अहवालावरुन उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 5:56 PM

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपच्या (bjp) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याऐवजी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत असतानाच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत केल्याने त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणं आणि फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत करणं या गोष्टी शिवसेना-भाजपमधील नव्या अध्यायाची सुरुवात तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

शिवसेनेने द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला त्याबद्दल आनंद आहे. द्रोपदी मुर्मू या आदिवासी समाजातील आहेत. त्यांना खरेतर बिनविरोधच निवडून द्यायला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली तर सर्वात आधी मीडियाला कळवू असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सहा महिन्यांची डेडलाईन

राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कृषिपंपाचा मार्च 2022 पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात आला पाहिजे. कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौर ऊर्जेला प्राधान्य देत, मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या 6 महिन्यात पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. यासाठी केंद्र सरकारची ‘कुसुम’ योजना आणि राज्य सरकारची योजना अशा दोन्ही योजनांचा वापर करीत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले. ज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात 2018 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव तसेच विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणा

याची जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करा आणि वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. विकेंद्रित सौर निर्मितीतून 4500 MW वीज निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेत आहे. अशा प्रकल्पांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि गतीने ही योजना कार्यान्वित करावी. किमान 30 टक्के फिडर यावर्षी सौर ऊर्जेवर जातील, या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्यात करा. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. खासगीसोबतच महावितरणने सुद्धा स्वनिर्मितीचे जिल्हाश: उद्दिष्ट निश्चित करावे, असे निर्देशरही त्यांनी दिले. याशिवाय उपसा सिंचन योजना सुद्धा सौर उर्जेवर आणण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत, असे आदेश त्यांनी दिले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....