पवार म्हणाले मी मुख्यमंत्री होतो ते लक्षात नाही, आता फडणवीस म्हणाले, मी सलग 5 वर्षे होतो ना? पवारांच्या दुखऱ्या नसीवर बोट?
फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. तर पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ‘जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं’ असं वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. तर पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. (Devendra Fadnavis reply to Sharad Pawar’s criticism about post of CM)
फडणवीसांच्या ‘त्या’ शरद पवार काय म्हणाले?
कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. मी ही चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर
फरक एवढाच आहे की मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षानंतर सगळ पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. पवारसाहेबही मोठे नेते आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले पण ते सगळ पाच वर्षे कधीच राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं, त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी दोन वर्षे, कधी दीड वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहता आलं. मला एका गोष्टीचं यावेळी समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालीय. हीच माझ्या कामाची पावती आहे, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मन की बात’ केलीय. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.
इतर बातम्या :
‘आयकर विभाग 7 दिवस टोटल मारत आहे तरी हिशेब लागत नाही’, किरीट सोमय्यांच्या दाव्यानं मोठी खळबळ!
Devendra Fadnavis reply to Sharad Pawar’s criticism about post of CM