Video : असे फालतू चिल्लर लोक असतातच, चप्पल फेकीवरुन देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं
चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना (NCP) फटकारलं आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मधील भोसरी गावातील मारुती लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी फडणवीस आले त्यावेळी त्याची बैलगाडी मधून मिरवणूक काढण्यात आली. यानंतरच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यावर भाष्य केलं. चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना (NCP) फटकारलं आहे. स्वतः काही करायचं नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करून दाखवलं. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये असूया आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीच्या लोकांची बुद्धी तपासून पाहण्याची आवश्यकता
मला एका गोष्टीच दुःख आहे. की, मराठा आरक्षणा करिता ज्या अण्णासाहेब पाटलांनी सर्वस्व पणाला लावल आणि आपला जीव दिला. अक्षरशः बलिदान दिले. अण्णासाहेब पाटलांच्या पुतळ्याच्या उदघटनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं काम आणि अटलजी यांना विरोध होण्याचं काम होत असेल. तर कुठेतरी ह्यांची बुद्धी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला यांच्या बुद्धीची कीव येते
कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघते, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करतायेत. एखादं चांगलं काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत अन दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची. देव त्यांना सुदबुद्धी देवो. अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्याना समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडली. मला यांच्या बुद्धीची कीव येते, असं फडणवीस म्हणाले.
राज्यातील या सरकारला महाविकासआघाडी म्हणायचं की महावसुलीआघाडी म्हणायचं.मेट्रोचे श्रेय बरेच जण येतात असं म्हणत शरद पवारांना टोला, पण याचं श्रेय फक्त मोदींचं आहे आता हे वॉर्डाची रचना बदलत आहेत. काय-काय बदलायचं ते बदला, आम्हाला काहीच फरक पडत नाही. या जनतेच्या विश्वासावर आम्ही या महापालिकेत पुन्हा बसू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.