मंत्री आत्ममग्न, अख्खं सरकार आत्ममग्न, राज्यात सरकार आहे की नाही?; फडणवीस कडाडले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारव टीकास्त्र सोडलं आहे. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)

पंढरपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारव टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी, ऑक्सिन नाही, रेमडेसीवीर नाही, बेड नाहीत, अशी अवस्था राज्याची झाली आहे, असं सांगतानाच मंत्री आत्ममग्न आहेत. अख्खं सरकार आत्ममग्न आहे, राज्यात सरकारच आहे की नाही?; असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)
पंढरपूर-मंगळवेढा येथील पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली. आपण सारे इतक्या मोठ्यासंख्येने उपस्थित आहात, यापेक्षा आपण सारे मास्क घालून उपस्थित आहात, याचा मला अधिक आनंद आहे. मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला आपण मैदानात उतरविले आहे. विकासाची नवीन वाट मंगळवेढा, पंढरपूरला दाखविण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देणार हे नक्की आहे, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार हे लबाड सरकार आहे. त्यांची आश्वासने ही लबाडी आहे. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे होत नाही. त्यामुळे 15 वर्ष जे सत्तेत होते, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. वीज बिलांना स्थगिती दिली, तेव्हा वाटले राजा उदार झाला. पण, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी वीज वसुली सुरू केली, अशी टीका फडणवीस यांनी केली.
महाविकास ते महावसुली आघाडी
17 एप्रिल रोजी मतदान झाले की, हे सरकार पुन्हा 18 एप्रिलपासून तुमची वीज कापणार. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित कोण, तर मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटींची सूट दिली. गरीब, शेतकरी यांना मात्र मदत करायला पैसा नाही, हे सांगणारे हे सरकार आहे. पूर्वी हे सरकार होते, महाविकास आघाडी. नंतर झाले, महाविनाश आघाडी आणि आता झाले, महावसुली आघाडी. आज पोलिसांना हप्तेवसुलीचे टार्गेट दिले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
दिल्लीतून निधी आणू
सरकारमध्ये आले, तेव्हा बांधावर जाऊन सांगायचे, 50 हजार देऊ, दीड लाख देऊ. आपण आज 2000 रुपयेही कुणाला मिळाले नाही. हे म्हणाले कर्जमुक्ती देऊ. पण, आज जनतेला या सरकारपासून मुक्ती मागण्याची वेळ आली आहे, असं सांगतानाच आमच्या सरकारच्या 5 वर्षांच्या काळात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम केले. 35 गावांमध्ये पाण्यासाठी प्रत्येकवेळी आश्वासन दिले जाते. पण, होत काही नाही. मात्र, सरकारने पैसा दिला नाही तरी जो निधी लागेल, तो आम्ही थेट दिल्लीहून आणू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 12 April 2021 https://t.co/cvDoUSh8b3
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
संबंधित बातम्या:
सरकार पाडतील तेव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; राऊतांचा खोचक टोला
लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक
(Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)