Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत म्हणजे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’; देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा वार

पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. (devendra fadnavis slams sanjay raut over five states election results)

संजय राऊत म्हणजे 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना'; देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा वार
devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:04 PM

मुंबई: पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पाच राज्यांचा निकाल लागला आहे. यांचा या विजयाशी संबंध काय? असा सवाल करतानाच संजय राऊत आणि आघाडीचे नेते म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत, असा बोचरा वार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (devendra fadnavis slams sanjay raut over five states election results)

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ही टीका केली आहे. बंगालमध्ये आम्हाला सत्ता मिळाली नाही. परंतु, बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला आता सुरू झाला आहे. बंगालमध्ये शिवसेनेचा संबंध नाही. राष्ट्रवादी आज हरलेली आहे. काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे. ममतादीदींच्या यशामुळे यांना आनंद झाला आहे. मला संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य ऐकून एका गोष्टीच आश्चर्य वाटत. बेगानी शादी मे अब्दुला दिवाना हे मी आज पाहिलं. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटण्याचं काम करताना हे नेते दिसले, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

करेक्ट कार्यक्रम करणारच

मी करेक्ट कार्यक्रम करतो असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्यवेळ आल्यावर ते करणारच आहोत. पण आज योग्य वेळ नाही. आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त

आम्हाला इतर राज्यात पण योग्य यश मिळालं आहे. बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीतून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. बंगाल आता कम्युनिस्ट मुक्त आणि काँग्रेसमुक्त झाला आहे, असं सांगतानाच बंगालमध्ये भाजप आली नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शरहा यांची लोकप्रियता कमी झाल्याचं बोललं जात आहे. असं असेल तर मग इतर राज्यांमध्ये आम्ही मोठं यश मिळवलं आहे. त्याचं काय विश्लेषण करायचं? असा सवालही त्यांनी केला.

हा सरकारविरोधी कौल

पंढरपूर निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. दीड वर्षाच्या महाविकास आघाडीच्या गैरकारभाराच्या भोंगळ कारभाराला आरसा दाखविण्याचे काम मतदारांनी केलं आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि तिन्ही पक्षांचे नेते असताना समाधान अवताडे निवडून आले. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारविरोधात किती रोष आहे, हे यातून स्पष्ट होतं, असंही ते म्हणाले. (devendra fadnavis slams sanjay raut over five states election results)

संबंधित बातम्या:

West Bengal Election Results 2021 LIVE: अफवा पसरवू नका, मतमोजणी सुरु, ममता बॅनर्जींच्या पराभवाच्या बातम्यांवर टीएमसीचं स्पष्टीकरण

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंदू अधिकारी विजयी

Belgaum Election Result 2021 LIVE | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा 1622 मतांनी पराभव

(devendra fadnavis slams sanjay raut over five states election results)

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.