Devendra Fadnavis : कोण होणार नाशिकचे नवे पालकमंत्री, दोघांच्या नावाची चर्चा, तर शेजारील जिल्हातील महाजन रेसमध्ये सर्वात पुढे!

यादरम्यान एक चर्चा प्रचंड रंगताना दिसते आहे, ती म्हणजे नाशिकचे नवे पालकमंत्री कोण असणार? महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री होती. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर कालच उध्दव ठाकरे यांना राजीनामा दिला असल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. महाविकास आघाडी असो किंवा युती सरकार असो. यामध्ये ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार नाशिक जिल्हात आहेत.

Devendra Fadnavis : कोण होणार नाशिकचे नवे पालकमंत्री, दोघांच्या नावाची चर्चा, तर शेजारील जिल्हातील महाजन रेसमध्ये सर्वात पुढे!
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 4:50 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बंडखोरी आणि सत्तासंघर्ष संपूर्ण राज्याने बघितला. आता एकनाथ शिंदे तब्बल 10 दिवसांनी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावरून निघाल्यावर एकनाथ शिंदे यांना कडेकोट सुरक्षा देण्यात आली होती. राज्य सरकारकडून पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला. शिंदे यांच्या गाडीच्या मागे पुढेही अनेक गाड्यांचा ताफा होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आजच शपथ येणार असल्याचे  चर्चा आहे. सत्तास्थापनेसाठी संपूर्ण भाजप कामाला लागले आहे. सागर बंगल्यावरील भाजपाच्या (BJP) नेत्यांच्या बैठकाही सुरू आहेत. एकनाथ शिंदे गट भाजपासोबतच सत्तास्थापन करणार असल्याचेही स्पष्ट आहे.

गिरीष महाजन यांना संधी मिळण्याची दाट शक्यता

यादरम्यान एक चर्चा प्रचंड रंगताना दिसते आहे, ती म्हणजे नाशिकचे नवे पालकमंत्री कोण असणार? महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री होती. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर कालच उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. महाविकास आघाडी असो किंवा युती सरकार असो. यामध्ये ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार नाशिक जिल्हात आहेत, त्याच पक्षाचा पालकमंत्री निवडला जातो. मात्र, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शेजारच्या जिल्हातील देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू गिरीष महाजन यांचेही नाव जोरदार चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

सुहास कांदे आणि देवयानी फरांदे यांचीही नावाची चर्चा

जर नाशिकचा पालकमंत्री आयात न करता जिल्हातीलच आमदाराला संधी मिळाली तर भाजपाचे जिल्हात एकून पाच आमदार, शिवसेनेचे दोन आमदार आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे सुहास कांदे आणि भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ राहुल आहेर, दिलीप बोरसे, दादा भुसे यांनाही पालकमंत्री पदासाठी संधी मिळू शकते. मात्र, मंत्रीपद कोणाच्या वाट्याला येते हे महत्वाचे राहणार आहे. पालकमंत्र्याच्या रेसमध्ये सध्यातरी गिरीष महाजन यांचे नाव पुढे आहे, जर एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने आयात पालकमंत्र्यांला विरोध केलातर जिल्हातील आमदारांना संधी मिळू शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.