वकिलीबाणा, आक्रमकता, प्रशासनावर पकड, फडणवीसांनी एकहाती अधिवेशन गाजवलं; सत्ताधाऱ्यांचा पुअर शो!

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज संपत आहे. कोरोनामुळे या अधिवेशनाचा कालावधी अवघ्या दहा दिवसाचा ठेवण्यात आला. (devendra fadnavis trapped maha vikas aghadi in assembly session on various issues)

वकिलीबाणा, आक्रमकता, प्रशासनावर पकड, फडणवीसांनी एकहाती अधिवेशन गाजवलं; सत्ताधाऱ्यांचा पुअर शो!
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:47 PM

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज संपत आहे. कोरोनामुळे या अधिवेशनाचा कालावधी अवघ्या दहा दिवसाचा ठेवण्यात आला. पण हे दहा दिवस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गाजवले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणापर्यंत फडणवीस यांनी हातात पुरावे घेऊन जोरदार बॅटिंग केली. सत्ताधाऱ्यांची अब्रू वेशीवर टांगण्यात फडणवीस यशस्वी ठरले तर त्या मानाने सत्तेचा अनुभव असलेल्या आघाडी सरकारचा पुअर शो राहिला. (devendra fadnavis trapped maha vikas aghadi in assembly session on various issues)

1 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. अवघ्या दहा दिवसाचं अधिवेशन घेण्यात आलं. त्यातही शनिवार-रविवारची सुट्टी. त्यामुळे कामकाज जेमतेम आठ दिवसाचंच ठेवण्यात आलं. कोरोनाचं कारण पुढे करून सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला. मात्र, राज्यातील प्रश्नांना उत्तरे देण्यापासून पळ काढण्यासाठी सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सरकारवर पहिल्याच दिवसापासून दबाव आणला.

फडणवीसांची बॅटिंग

देवेंद्र फडणवीस यांनी निर्विवादपणे एकट्यानेच हे अधिवेशन गाजवलं. मनसुख हिरेन प्रकरण विधानसभेत मांडल्यानंतर सर्वात आधी त्यांनी हिरेन यांचा जबाब वाचून दाखवून गृहमंत्री अनिल देशमुख यांना तोंडघशी पाडले. सापडलेली गाडी हिरेन यांच्या मालकीची नव्हती. त्यांच्या मित्राची गाडी होती. वाझे यांचे हात बांधलेले नव्हते. ठाण्यात पोस्टमार्टम होत आहे. त्यातून सर्वा माहिती पुढे येईलय तसेच या प्रकरणाचा तपास वाझे करत नसून नितीन अलकनुरे करत आहेत, असं सांगत देशमुख यांनी फडणवीसांचे सर्व मुद्दे खोडून टाकले. त्यानंतर पुन्हा फडणवीसांनी उभं राहून गृहमंत्र्यांच्या निवेदनाला आक्षेप घेतला आणि त्यांनी थेट हिरेन यांनी पोलिसांना दिलेला कबुली जवाब वाचून दाखवला. हिरेन यांनी ही गाडी विकत घेतली असल्याचं कबुली जबाबात म्हटलं आहे. पोलीस तुम्हाला माहिती देत नाही का? पोलीस तुम्हाला चुकीचं ब्रिफिंग करत आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच अलकनुरे यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी तपास दिला आहे. सात दिवस तर वाझेच तपास करत होते, असंही फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे देशमुख चांगलेच कोंडीत सापडले.

विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला

त्यानंतर काल फडणवीस यांनी विधानसभेत विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवून एकच धमाका उडवून दिला. सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचं विमला हिरेन यांनी म्हटलं आहे. त्यांनी वाझे आणि हिरेन यांचे संबंध होते आणि हिरेन यांच्या हत्येपर्यंतचा घटनाक्रम सांगितेलला आहे. त्यामुळे सर्व पुरावे असताना वाझे यांना अटक का होत नाही, असा युक्तीवाद फडणवीस यांनी केला. त्यामुळे सरकारची एकच भंबरी उडाली. त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

फडणवीसांचे आरोप आणि बैठका

फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर सत्ताधाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक बोलावून गृहमंत्री आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर देशमुख यांनी सभागृहात येऊन निवेदन दिलं. परंतु, फडणवीसांचा एकही आरोप देशमुख यांना खोडता आला नाही.

वाझेंवर कारवाई

फडणवीस यांनी विधानसभेत सचिन वाझेंची पोलखोल केल्यानंतर अखेर देशमुख यांनी त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना क्राईम ब्रँचमधून हटवून दुसऱ्या विभागात टाकण्यात येणार आहे, अशी घोषणा देशमुख यांना करावी लागली.

पूजा चव्हाण प्रकरणी राठोडांचा राजीनामा

त्या आधी फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सरकारला कोंडीत पकडलं. प्रश्नांचा भडीमार केल्याने अखेर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकीकडे फडणवीस विधानसभेत लढत देत असतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रस्त्यावरची लढाई लढून सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं होतं. त्यामुळे या प्रकरणात ठाकरे सरकारची प्रचंड नामुष्की झाली होती.

वकिलीबाणा आणि प्रशासनावर पकड

देवेंद्र फडणवीस हे पेशाने वकील आहेत. त्यांचा वकिली बाणा पूजा चव्हाण आणि हिरेन प्रकरणी पाहायला मिळाला. कायद्याची उत्तम जाण असल्याने त्यांचा आवाका मोठा आहे. तसेच फडणवीस हे आक्रमक असल्याने युक्तीवाद आणि आक्रमकता या दोन आयुधांच्या बळावर त्यांनी विधानसभा गाजवली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुखांपासून ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपर्यंतचे संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांनाही फडणवीसांचा हल्ला परतवून लावता आला नाही. त्यातच प्रशासनातून हवी ती माहिती मिळवण्यातही फडणवीस यशस्वी झाले आहेत. त्यातून त्यांची प्रशासनावर असलेली पकडही दिसून आली आहे. (devendra fadnavis trapped maha vikas aghadi in assembly session on various issues)

संसदीय आयुधांचा खुबीने वापर

या अधिवेशन काळात फडणवीस यांनी संसदीय आयुधांचा खुबीने वापर करत सरकारला अडचणीत आणले. फडणवीसांनी अत्यंत चालाखीने या आयुधांचा वापर केला आणि सरकार त्यात फसत गेल्याने सरकारची चांगलीच फजिती झाली. आज तर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणात कोर्टाचा निकाल आल्यानंतर गृहमंत्र्यांनी हेतूपुरस्सरपणे आपल्यावर आरोप केल्याचं सांगत त्यांनी हा हक्कभंग दाखल केला. यातून फडणवीसांचा संसदीय अभ्यास, संसदीय आयुधांचा केव्हा आणि कधी वापर करण्याची असलेली जाणीव आणि वकिलीबाण्याचा वापर करण्याची कुशलता दिसून येते. (devendra fadnavis trapped maha vikas aghadi in assembly session on various issues)

संबंधित बातम्या:

Who is Sachin Vaze : अर्णबला घरातून उचलणारे ते आता अंबानी स्फोटकप्रकरणात चर्चेत असलेले इन्काऊंट स्पेशालिस्ट सचिन वाझे कोण?

VIDEO: मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये मनसुख हिरेन यांना कोण भेटलं?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Mukesh Ambani bomb scare : फडणवीसांच्या 4 प्रश्नांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आरोपीच्या पिंजऱ्यात

(devendra fadnavis trapped maha vikas aghadi in assembly session on various issues)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.