श्याम मानव यांचे सनसनाटी दावे, देशमुख आणि फडणवीस आमने-सामने

महाविकास आघाडी सरकारच्या वेळी ठाकरेंसह चौघांना अडकवण्याचा डाव होता. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर फडणवीसांनी दवाब टाकल्याचा आरोप श्याम मानवांनी केला आहे.

श्याम मानव यांचे सनसनाटी दावे, देशमुख आणि फडणवीस आमने-सामने
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 9:25 PM

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनी, सनसनाटी दावे करुन खळबळ उडवली. महाविकास आघाडी सरकारमध्ये, फडणवीसांद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांकडे 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करुन देण्यास सांगितलं. ज्याद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार अडकतील. त्यामोबदल्यात तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही, यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याचं श्याम मानव म्हणाले आहेत.

तीन प्रतिज्ञापत्रात काय होते?

  • ठाकरेंच्या मुलानं दिशा सालियावर बलात्कार करुन खून केला.
  • अनिल परबांच्या अवैध बांधकामांच्या प्रतिज्ञापत्रावर सही करा.
  • अजित पवारांनी गुटखावाल्यांकडून पैसे घेण्यास सांगितलं.

सुपारी घेवून बोलणाऱ्यांच्या नादी श्याम मानव लागलेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. ‘श्याम मानव इतक्या वर्षांपासून मला ओळखतात. त्यांनी आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. आता इको सिस्टममध्ये सुपारीबाज लोकं घुसले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का? अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकासआघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते काय सुटले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीयेत. १०० कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.’

त्याचवेळी मविआच्या काळातील ऑडिओ व्हिडीओ क्लीप, समोर आणण्याचा इशारा दिला. श्याम मानवांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे आरोप सत्य असल्याचं म्हटलं आहे.

एकीकडे, श्याम मानवांनी फडणवीसांवर आरोप केलेत तर दुसरीकडे CBIनं कोर्टात चार्जशीट दाखल केल्यानं देशमुखांच्या अडचणी वाढल्यात. चार्जशीटमध्ये नेमकं काय आहे तेही पाहुयात.

  • गृहमंत्री असताना देशमुखांनी गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढेवर दबाव टाकल्याचा आरोप आहे.
  • विजय भास्करराव पाटील यांची गिरीश महाजनांविरुद्ध तक्रार येण्याआधीच अनिल देशमुखांचा फोन आल्याचं प्रवीण मुंढेंनी सांगितलं.
  • विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी सांगितलं की देशमुखांचे आदेश आहेत की गुन्हा दाखल करा.
  • घटनाक्रम जळगावच्या हद्दीतला नव्हता तरीही गृहमंत्री देशमुख धमकावत असल्यानं गुन्हा दाखल केला.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, आरोपांची जुनी फाईल वर आलीये. ज्यात अनिल देशमुख आणि फडणवीस आमने-सामने आले आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.