‘व्हिडीओतील फेरफार बाहेर येईल’, फडणवीसांच्या ‘व्हिडीओ बॉम्ब’वर विशेष सरकारी वकिलांची पहिली प्रतिक्रिया

विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत आता प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल, असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत.

'व्हिडीओतील फेरफार बाहेर येईल', फडणवीसांच्या 'व्हिडीओ बॉम्ब'वर विशेष सरकारी वकिलांची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते आणि प्रवीण चव्हाण, विशेष सरकारी वकीलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 10:55 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत ‘व्हिडीओ बॉम्ब’ टाकून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण (Pravin Chavan) यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत आता प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल, असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत.

फडणवीसांच्या आरोपांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया प्रवीण चव्हाण यांनी दिलीय.

फडणवीसांनी अध्यक्षांना पेन-ड्राईव्ह दिला

देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह अध्यक्षांना दिला. कशाप्रकारची कट कारस्थानं सरकार शिजवतयं त्याची उदाहरणं आणि पुरावे मी या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या : 

देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बवर सरकारकडून सावध प्रतिक्रिया, व्हिडीओची सत्यता पडताळून बोलणार – गृहमंत्री

Video : देवेंद्र फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब! विशेष सरकारी वकिलांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गिरीश महाजनांबाबत कोणता गौप्यस्फोट?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.