फडणवीसांचं काऊंटडाऊन सुरु, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है: अशोक चव्हाण
मुंबई: “भाजपचा तीन राज्यातील पराभव म्हणजे तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. भाजपची घरवापसी निश्चित आहे, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही काही महिन्यांसाठीच असेल”, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आज अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]
मुंबई: “भाजपचा तीन राज्यातील पराभव म्हणजे तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. भाजपची घरवापसी निश्चित आहे, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही काही महिन्यांसाठीच असेल”, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आज अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं.
यावेळी अशोक चव्हाण आणि विखे पाटील यांनी तीन राज्यातील विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं अभिनंदन केलं. तसंच भाजपवर तुफान हल्लाबोल केला.
अशोक चव्हाण म्हणाले, “महागाई, अत्याचार, बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर भाजप सरकार अपयशी ठरलं आहे. भाजपने उद्योगपतींसाठी सत्ता वापरली. तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा, धनशक्तीवर जनशक्तीचा हा विजय आहे. लोकविरोधी भाजप सरकारविरोधात हा जनतेचा कौल आहे, हा लोकशाहीचा विजय आहे”
दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपलाही आव्हान दिलं. राज्यातील फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. महाराष्ट्रात आता काही महिन्यांसाठी हे सरकार असेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
याशिवाय काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागता पहारा दिल्याने ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाली नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर निशाणा
काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, “राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सर्व ट्रेंड बदलला होता. त्यांनी अनेक मुद्दे लावून धरले. सर्व काँग्रेस नेते एकत्र येऊन हे यश मिळवलं आहे. देशात कोणी कोणत्या पक्षाला संपवू शकत नाही”.
संबंधित बातम्या
आता महाराष्ट्राचा नंबर : पृथ्वीराज चव्हाण
विजयरथ रोखला, ‘मोदीराज’मध्ये काँग्रेसने पहिल्यांदाच सत्ता हिसकावली!
मिझोरामचे मुख्यमंत्री 2 ठिकाणी उभे राहिले, दोन्ही ठिकाणी पडले
मुंबई भाजप कार्यालयात झेंडे लावून कार्यकर्ते पसार
तेलंगणात ओवेसींच्या भावाचा निकाल लागला!
वाजपेयींच्या पुतणीने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची धाकधूक वाढवली!