फडणवीस म्हणतात, राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, मग चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर का?

त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाहीट, असं फडणवीसांनी म्हटलंय.

फडणवीस म्हणतात, राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, मग चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर का?
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 4:23 PM

मुंबई : भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ‘कृष्णकुंज’वर जात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात महाविकास आघाडीला भाजप आणि मनसे युतीचा पर्याय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पाटील आणि ठाकरे भेटीनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. ‘राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक इतकाच आहे, त्यांची परप्रांतियांशी जी भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही, असं फडणवीसांनी म्हटलंय. (Devendra Fadnavis’s reaction to the meeting between Raj Thackeray and Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की युतीबाबत या भेटीत चर्चा नाही. मला वाटतं महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावं यावर बंधणं नाहीत. राजकारणात जर आणि तरच्या मुद्द्याला स्थान नसतं. परप्रांतियांबद्दल त्यांच्या जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्यांनी स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका आणि आमचं हिंदुत्व हा समान धागा आहे. मात्र, अद्यापही दुसरा जो मुद्दा आहे त्याचं निराकरण होत नाही तोवर जर तरला काही महत्व नाही, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी ही सकारात्मक भेट आहे आणि भविष्यात मैत्रीचा हात पुढे केला जाईल अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यावर विचारलं असता. बाळा नांदगावकर यांना तसं वाटलं असेल आणि ते स्वाभाविक आहे, असं फडणवीस म्हणाले.

लोकलच्या मुद्द्यावर फडणवीस आक्रमक

बसमध्ये दाटीवाटीने लोक बसतात, त्यावेळी कोरोना होत नाही का?, असा प्रश्न कोर्टाने विचारला. लोकांचे हाल होत आहेत, मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे. सर्वांना प्रवेश न देता ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी. आमचं आंदोलन आणि हायकोर्टाची सूचना याची दखल राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

राज ठाकरे हे परप्रांतियांच्ंया विरोधात असल्याचं चित्रं आहे. हे चित्रं त्यांनी बदललं पाहिजे. त्यांनी भूमिका व्यापक करत नाही, तोपर्यंत थोडी मर्यादा राहील. त्यांनी भूमिका सांगितली. आता ती व्यवहारात आणली पाहिजे. ते तेवढं शक्य नाही. त्यांच्या मनात कुणाबद्दल कटुता नाही याबाबत मी कन्व्हिन्स झालो आहे. पण याचा निष्कर्ष असा नाही की उद्याच निवडणुकीवर चर्चा होईल आणि जागा वाटप होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

युतीचा प्रस्ताव नाही

त्यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेटी होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

जर मुंबईत सेनेची ताकद तर महापालिकेची निवडणूक लढवा, राज ठाकरेंच्या अंगणातून चंद्रकांतदादांचं राऊतांना चॅलेंज

मनसे-भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच आहे; बाळा नांदगावकरांनी दिले युतीचे संकेत

Devendra Fadnavis’s reaction on meeting between Raj Thackeray and Chandrakant Patil

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.