Devendrad Fadnavis : भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश, अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना

BJP : भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

Devendrad Fadnavis : भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश, अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 9:11 AM

मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदे यांचं बंड महराष्ट्रातसह देशभरात चर्चेचा विषय बनलाय. त्यांच्या या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. शिंदे गट आधी गुजरातमधील सुरतमध्ये होता. त्यानंतर त्यांनी आसाममधील गुवाहाटी गाठलं. या दोनही राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील शंकेला अधिकची पालवी फुटली. अश्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे.आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने (BJP) आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आमदारांना हजर राहण्याचे आदेश

एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे.आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

हे सुद्धा वाचा

बैठकीत काय झालं?

भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. मुंबईत भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एक महत्वाचं विधान केलंय. “राज्यपालांना पत्र देण्याबाबत आम्ही विधिज्ञांना विचारुन मग पुढील प्रक्रिया करणार आहोत. मला वाटतं जे काही अविश्वास वगैरे असतो, त्याला कोणतीही बंदी न्यायालयाने केलेली नाही. पाठींबा काढून घेतल्यानं राज्यपालांना आम्ही कळवलं, तर राज्यपालांना अधिवेशन बोलवावं लागले. आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही का दुखावलो गेलो, यावर त्यांनी चर्चा करावी. त्यांनी चर्चा करावी. चर्चा त्यांची जेव्हा होईल, त्यात सकारात्मक काही निघालं की पुढे शिंदेसाहेबांना सांगितलं की ते शिंदेसाहेब स्वतःहून पुढे येतील. शिंदेसाहेबांच्या मनात कुठेही असं नाहीये की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं”, असं दीपक केसरकर म्हणालेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.