Kolhapur : लोकसभा निवडणुकीत घात झाला, आता वचपा काढणार, धंनजय महाडिकांचे सतेज पाटलांना थेट आव्हान

गेल्या अडीत वर्षाच्या काळात धनंजय महाडिक यांच्या राजकीय कार्यकीर्दला घरघर लागली होती. त्यांच्या साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थावरही सतेज पाटील यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. दरम्यानच्या काळात ते आर्थिक अडचणीतही आले होते. असे असतानाच विरोधकांकडून खोट्या केसेस टाकून अभिमन्यूसारखे घेरले गेल्याचे त्यांनी आज दहिहंडीच्या कार्यक्रमात सांगितले.

Kolhapur : लोकसभा निवडणुकीत घात झाला, आता वचपा काढणार, धंनजय महाडिकांचे सतेज पाटलांना थेट आव्हान
खासदार धनंजय महाडिक आणि आ. सतेज पाटील
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 9:32 PM

कोल्हापूर : खासदारकीच्या माध्यमातुन (Dhananjay Mahadik) धनंजय महाडिक यांचे राजकीय पुन्नर्वसन झाले आहे. तेव्हापासून (Kolhapur Politics) कोल्हापूरचा राजकीय आडाखा अधिकच तापू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभा आणि गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांनाच यश मिळाले होते. त्यामुळे कोल्हापुरचे राजकारण एकतर्फि असल्याचे चित्र असतानाच मध्यंतरीच (Rajya Sabha elections) राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात सतेज पाटील यांचे एक वाक्य होते ते म्हणजे आमचं ठरलयं..मात्र ठरल्याप्रमाणे काहीच झाले नाही, उलट माझा घात झाल्याचे आता धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय दहीहंड्याच्या दिवशीच त्यांनाी येथून पुढे राजकारणात महाभारत होणार म्हणत सतेज पाटलांवर जोरदारी टोलेबाजी केली आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापूरच्या राजकीय आडाख्यात कोण सरस राहणार हे पहावे लागणार आहे.

अडीच वर्षाचा इचिहास कोल्हापूरकरांसमोर

गेल्या अडीत वर्षाच्या काळात धनंजय महाडिक यांच्या राजकीय कार्यकीर्दला घरघर लागली होती. त्यांच्या साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थावरही सतेज पाटील यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. दरम्यानच्या काळात ते आर्थिक अडचणीतही आले होते. असे असतानाच विरोधकांकडून खोट्या केसेस टाकून अभिमन्यूसारखे घेरले गेल्याचे त्यांनी आज दहिहंडीच्या कार्यक्रमात सांगितले. त्यांनी गेल्या अडीच वर्षातील घडामोडीच कोल्हापूरकरांसमोर ठेवल्या. त्यामुळे इतिहासाचे साक्षीदार झालात आता भविष्य काळ आपलाच म्हणत त्यांनी थेट आव्हान दिले आहे.

वाईटाचा नाश हेच ध्येय

गेल्या अडीच वर्षाच्या काळात केवळ माझ्या एकट्यावरच नाहीतर सबंध कोल्हापुरकरांवर अन्याय झाला होता, पण आता काळ बदलतोय त्यामुळे वाईटाचा नाश अटळ असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले आहे. राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांची वर्णी लागते की नाही अशी स्थिती होती. मात्र, राजकीय खेळ्यानंतर त्यांचा विजय झाला होता. तेव्हापासून धनंजय महाडिक आणि सतेज पाटील हे परंपरागत प्रतिस्पर्धी पुन्हा समोरासमोर येणार हे निश्चित आहे.

हे सुद्धा वाचा

आता सर्वकाही मिळून

स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते देशाच्या राजकारणात कोल्हापूरची एक वेगळी छबी राहणार आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र बदल्यासाठी सज्ज आहोत असाच इशारा महाडिक यांनी दहीहंडीच्या माध्यमातून दिला आहे. शिवाय हे सर्व भाजप आणि मित्रपक्ष मिळून करणार असल्याचे म्हणत सोबतीला शिंदे गट असणार असाच त्याचा अर्थ होतो. मात्र, कोल्हापूरच्या राजकारणात वन वे असलेल्या सतेज पाटलांना आता आव्हानाला सामोरे जावे लागणार हे निश्चित.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.