धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं!

कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं आहे. कोल्हापुरात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेसाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे जात होते. तिकडे जात असतानाच, हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली. कोल्हापुरातील कागलमध्ये परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे […]

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं आहे. कोल्हापुरात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेसाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे जात होते. तिकडे जात असतानाच, हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली.

कोल्हापुरातील कागलमध्ये परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे येणार होते. मात्र, हेलिकॉप्टर भरकटल्याने मुंडे आणि भुजबळ पोहोचू शकले नाहीत.

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते सुखरुप आहेत.

वाऱ्याचा वेग उलट दिशेने असल्याने धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. त्यामुले कोल्हापूरऐवजी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर बीडमध्ये उतरवण्यात आलं. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील नेते हसन मुश्रीफ यांनी सभास्थळी दिली.

मी सुखरुप, हेलिकॉप्टर भरकटले नव्हते, अफवांवर विश्वास ठेवू नका : धनंजय मुंडे

दरम्यान, हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. ते म्हणाले, “मी बीड येथील भगवानगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही 10 मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत.”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.