ताईसाहेब राष्ट्रीय सरचिटणीस, पण केजमध्ये कमळच नाही, मंत्री धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

बीड नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे आणि भाजपवर निशाणा साधला

ताईसाहेब राष्ट्रीय सरचिटणीस, पण केजमध्ये कमळच नाही, मंत्री धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल
धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडेंवर टीका
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 1:21 PM

बीडः नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी केलेली टीका धनंजय मुंडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. आज बीड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपवर चांगलेच ताशेरे ओढले. तुम्ही 2019 मध्ये मंत्री असताना परळीने तुम्हाला तुमची औकात दाखवून दिली, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. तसेच आष्टी आणि केजमध्ये भाजप नाहीसे झाले आहे, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

धनंजय मुंडे म्हणाले, केजमध्ये भाजपच नाही. एक काळ आम्ही असा पाहिला, त्या काळात कमळाला एक जरी मत मिळालं तरी कमळाचे चिन्ह द्यायचे. आता अशी वेळ आली आहे की, कमळावर मत आले नाही तर कमळच काढून घ्यायचं आणि दुसरं उभं करायचं. असं आष्टीतही केलंय. तीन वॉर्डात कमळ नाही. देशात शतप्रतिशत कमळ आहे तर आष्टीच्या तीन ठिकाणी कमळ का नाही, कारण तुम्हाला माहितीय, तिथं कमळाला मत मिळत नाहीत, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

सुविधा देणं हा आमच्या मते विकास नाही- धनंजय मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले, ‘ इथं आमची औकात काढणाऱ्याला आष्टीच्या जनतेनं दाखवलंय. नगर पंचायत निवडणुकीत दिवा बत्ती घरकुल स्वच्छ पाणी चांगले रस्ते स्वच्छता, नाली, काढणं आणि करणं आमचं कर्तव्य आहे. कुणी म्हणत असेल आम्ही विकास केला तर ते तुमचं कर्तव्य आहे. मी परळीत रस्ते, नाली, सभागृगह केलं असेल तर ते माझं कर्तव्य आहे. माझ्या दृष्टीनं विकास काय तर असं काम करू की तुमच्या घरी, तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. यालाच आम्ही विकास म्हणतो.

दसरा मेळावा घेऊन कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत!

धनंजय मुंडे म्हणाले, ताईसाहेब तुम्ही मंत्री असताना 12 डिसेंबर 2014 ला ऊसतोड मजुरांचे महामंडळ काढले पण ते बंद पडले. मी ते महामंडळ नव्याने सुरु केले. हातात कोयता आणि दसरा मेळावा घेऊन ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी प्रत्यक्ष कामं करावी लागतात, असा टोला धनंजय मुंडे यांनीन लगावला.

इतर बातम्या-

सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा डाव होता, राऊतांचा गंभीर आरोप; संदर्भ नेमका काय? वाचा सविस्तर

भाजप चोरांचा बाजार, सोमय्या बॅन्ड बाराती; तपास यंत्रणेवरून मलिकांचा टोला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.