धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

| Updated on: Jan 13, 2021 | 3:32 PM

लैंगिक शोषणाचा आरोप असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (dhananjay munde should resign soon says chandrakant patil)

धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी
Follow us on

मुंबई: लैंगिक शोषणाचा आरोप असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (dhananjay munde should resign soon says chandrakant patil)

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होतात. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.

त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.” (dhananjay munde should resign soon says chandrakant patil)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

(dhananjay munde should resign soon says chandrakant patil)