भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की ते निवडणूकच विसरले पाहिजे; धनंजय मुंडेंचा घणाघात
भाजपला या मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की पुन्हा ते पदवीधरांची निवडणूकच विसरले पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. (dhananjay munde slams bjp over graduate constituency elections)
औरंगाबाद: मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या हक्काचे रोजगार आणि विधी विद्यापीठ विदर्भाला नेले. आज मात्र, ते मराठवाड्याची मते मागायला येत आहेत. त्यामुळे भाजपला या मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की पुन्हा ते पदवीधरांची निवडणूकच विसरले पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. (dhananjay munde slams bjp over graduate constituency elections)
महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांनी हा घणाघाती हल्ला केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात निवडणूक प्रचारासाठी येऊन गेल्याचं कळलं. फडणवीस आले तेव्हा मराठवाड्यातील तरुणांनी त्यांना रोजगार आणि विधी विद्यापीठा विषयी जाब विचारायला हवा होता. तुम्ही मुख्यमंत्री असताना आमचं विधी विद्यापीठ विदर्भात का नेलं? असा सवाल त्यांना करायला हवा होता. आज तुम्ही पदवीधरांसाठी मतं मागत आहात. पण आमचे उद्योग तुम्ही विदर्भाकडे का नेले? आमच्या हक्काचं जे जे होतं, ते विदर्भाला का दिलं? असा सवाल फडणवीस यांना विचारायला हवा होता, असं मुंडे म्हणाले.
आता ही निवणूक आपल्यासाठी संधी आहे. पदवीधरांच्या या निवडणुकीत भाजपला मराठवाड्याच्या मातीत असा गाडा की पुन्हा त्यांनी पदवीधरांची निवडणूक डोक्यातून काढून टाकली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी मराठवाड्यातील पदवीधर तरुणांना केलं.
चव्हाणांना विक्रमी मतांनी विजयी करा
सतिश चव्हाण हे निवडून येणारच आहेत. पण आपल्याला त्यांना विक्रमी मतांनी विजयी करायचं आहे, असं सांगतानाच आपल्या उमेदवारासाठी सर्वच पक्षाचे लोक काम करत आहेत, असंही ते म्हणाले. प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर लोकांना कळेपर्यंत आमचा प्रचारही पूर्ण झालाय, असा चिमटाही त्यांनी काढला. (dhananjay munde slams bjp over graduate constituency elections)
36 जिल्हे 72 बातम्या | 28 November 2020https://t.co/A1NGJN8XWi
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2020
संबंधित बातम्या:
संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवर निशाणा, व्यंगचित्र ट्वीट करत अप्रत्यक्ष भाजपवर टीका
शरद पवार इतकेच कळले का? ; पुस्तकावर धनंजय मुंडेची टीका
जयसिंगराव गायकवाड यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर धनंजय मुंडे
(dhananjay munde slams bjp over graduate constituency elections)