‘तक्रार मागे घ्या नाहीतर…’ धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी; वकिलांचा गंभीर आरोप
तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा मोठा आरोप रेणूच्या वकीलाकडून करण्यात आला आहे.
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असताना आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, रेणू शर्मा यांच्या वकिलाने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेल. तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा मोठा आरोप रेणूच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. (Dhananjay Munde threatens Renu Sharmas family Serious allegations by lawyers)
रेणू शर्मा ही सध्या डीएन नगर पोलीस स्थानकांमध्ये असून तिचा जबाब नोंदवण्यात येत आहे. गेल्या चार तासापासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दरम्यान, माध्यमांनी रेणूच्या वकिलांशी चर्चा केली असता त्यांनी हा गंभीर खुलासा केला. इतकंच नाही तर आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीत. अर्धच स्टेटमेंट्स घेतलं आहे. यामुळे आम्ही कोर्टात जाऊ असंही त्यांनी म्हटलं.
काय म्हणाले वकिल?
रेणूच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाला गेले 4 दिवस झाले तरी अद्याप FIR दाखल केली जात नाही. धनंजय मुंडे हे दबाव टाकत आहेत. रेणू विरुद्ध खोटे केस केले जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, बहिणीला केस widraw करायला सांगा नाहीतर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू असं धंनजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना धमकावलं असल्याचंही वकिलांनी माध्यमांसमोर सांगितलं.
दरम्यान, आज रेणु यांचं अर्धच स्टेटमेंट झालं असून उद्या 11 वाजता पुन्हा स्टेटमेंट रेकॉर्डसाठी बोलावण्यात आल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली आहे. खरंतर, या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे आणि आरोप समोर येत असताना रेणू शर्मावर धनंजय मुंडेंसह आणखी एका नेत्याने आरोप केले आहेत. भाजपचे नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे.
या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या असंही त्यांनी लिहिलं आहे. यासंबंधी माध्यमांनी रेणू शर्मा यांच्या वकिलांना प्रश्न केला असता याबद्दल अद्याप रेणू यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसून त्यांच्याशी बोलून माहिती देण्यात येईल असं वकिलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Dhananjay Munde threatens Renu Sharmas family Serious allegations by lawyers)
संबंधित बातम्या:
हसत हसत कडक इशारा, शरद पवार धनंजय मुंडेंवर कारवाई करणारच?
धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल: शरद पवार
(Dhananjay Munde threatens Renu Sharmas family Serious allegations by lawyers)