नगरमधून धनश्री सुजय विखे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल
अहमदनगर : भाजपचे नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे भाजपकडून धनश्री सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे धनश्री यांनी अचानक येऊन अर्ज दाखल केलाय. कोणताही गाजावाजा न करता त्या […]
अहमदनगर : भाजपचे नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे भाजपकडून धनश्री सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे धनश्री यांनी अचानक येऊन अर्ज दाखल केलाय.
कोणताही गाजावाजा न करता त्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे धनश्री विखे यांनी अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी 10 मिनिटे आधी येऊन हा अर्ज भरला. तसेच सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जास अडचण आल्यास पर्याय म्हणून धनश्री विखेंनी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सध्या धनश्री विखे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
छाननीत अर्ज रद्द झाल्यास पर्याय म्हणून अनेक उमेदवार पत्नीला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा अर्ज भरणं पसंत करतात. याचाच भाग म्हणून धनश्री यांनीही अर्ज भरला असावा असा अंदाज लावला जात आहे. कारण, धनश्री या राजकारणात फारशा सक्रिय नसतात. सुजय विखेंच्या भाजपप्रवेशावेळी त्या व्यासपीठावर दिसल्या होत्या. तर सुजय विखे यांचा जिल्ह्यात सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादीकडून त्यांच्यासमोर विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचं आव्हान आहे.