Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhule ZP winner list : भाजपची पुन्हा बाजी, गुजरातच्या सी. आर. पाटलांची कन्याही विजयी, धुळे जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आता जवळपास समोर आला आहे. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत याआधी भाजपची सत्ता होती. तीच सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आलं आहे.

Dhule ZP winner list : भाजपची पुन्हा बाजी, गुजरातच्या सी. आर. पाटलांची कन्याही विजयी, धुळे जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी
धुळे जिल्हा परिषद कार्यालय
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 5:29 PM

धुळे : राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आता जवळपास समोर आला आहे. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत याआधी भाजपची सत्ता होती. तीच सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आलं आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्हा परिषदेत 15 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सत्ता काय राखण्यासाठी भाजपला 2 जागांची आवश्यकता होती. पण पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपने तब्बल 8 जागांवर मजल मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेत भाजपने 29 आकड्यांची मॅजिक फिगर पार केलीय. विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे लामक गटातून विजयी झाल्या आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवारांची सविस्तर यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत.

धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा 15 जागांचा निकाल पुढीलप्रमाणे :

भाजप 8 जागांवर विजयी. विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

लामकाणी – धरती देवरे विजयी फागणे – अश्विनी पवार विजयी कुसुम्बा – संग्राम पाटील विजयी नगाव – राम भदाणे विजयी मालपूर – महावीरसिंग रावळ विजयी खलाणे – सोनी कदम विजयी नरडाना – संजीवनी सरोदे विजयी शिरूड – आशुतोष पाटील विजयी

राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी. विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

कापडणे – किरण पाटील विजयी मुकटी – मीनल पाटील विजयी बेटावद – ललीत वारुडे विजयी

शिवसेना 2 दोन जागांवर विजयी. विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

बोरकुंड – शालिनी भदाणे विजयी (बिनविरोध) रतनपुरा – अनिता पाटील

काँग्रेसही 2 दोन जागांवर विजयी. विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

नेर – आनंदा पाटील विजयी बोरविहिर – मोतनबाई पाटील विजयी

धुळे जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती (गण) निकाल

एकूण जागा : 30

भाजप -15 सेना – 3 राष्ट्रवादी – 3 काँग्रेस – 5 अपक्ष – 4

मागील निवडणुकीत धुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप – 39 काँग्रेस – 7 शिवसेना – 4 राष्ट्रवादी – 3 अपक्ष – 3

जयकुमार रावल यांची महाविकास आघाडीवर टीका

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे. त्यानंतर भाजप नेते जयकुमार रावल यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीविरोधात दिलेला हा कौल आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या. पैसे वाटले. मात्र तरीही त्यांचा पराभव झाला, अशी टीका रावल यांनी केलीय.

हेही वाचा :

शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव

VIDEO: पालघर जिल्हापरिषदेत थेट निवडणुकीत भाजपला धक्का; नंडोरे देवखोपच्या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.