राष्ट्रवादी हा पक्ष सोडला का? छगन भुजबळ यांनी काय दिले उत्तर

| Updated on: Jul 02, 2023 | 4:58 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. पण त्यांच्या नेतृत्वात मजबुतीने काम सुरु आहे, हे सत्य नाकारता येत नाही, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. आपण शिवसेना-भाजपसोबत का आलो, हे ही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी हा पक्ष सोडला का? छगन भुजबळ यांनी काय दिले उत्तर
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या भूकंपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अन् छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत बोलताना भुजबल यांना म्हटले की, अजित पवार यांच्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आहोत. तसेच महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. काही जणांचा गैरसमज आहे की, आम्ही पक्ष सोडलाय. तर तसं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सामील झालो आहोत. आम्ही सर्वांनी जो निर्णय घेतलाय, तो शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी घेतला, असा दावा राज्याचे नवनिर्विचित मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

ओबीसींचे प्रश्न सोडवणार

अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, आपणास सकारात्मक विचाराने काम करणं गरजेचे आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. पण त्यांच्या नेतृत्वात मजबुतीने काम सुरु आहे, हे सत्य नाकारता येत नाही. विकासाच्या नावाने चांगले काम सुरु आहे. ओबीसींचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय पर्याय नाहीत.

हे सुद्धा वाचा

विरोधकांची बैठक

पाटण्यात नुकतीच देशभरातील विरोधकांची बैठक झाली. या बैठकीनंतर एकमेकांवर रागावणं सुरु आहे. शरद पवार यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं की, येत्या २०२४ निवडणुकीत देशात मोदी सरकारच येणार आहे. त्यामुळे आम्ही सरकारला मदत केली पाहिजे. उगाच भांडण करुन प्रश्न सुटणार नाहीत. याउलट शासनात जाऊन प्रश्न मिटवले पाहिजेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.