ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा, सूत्रांची माहिती; संजय राऊतांचं ट्विट काय?
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ममता बॅनर्जी यांना भेटलो. राजकारण व बंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली.ममताजी आज सिध्दीविनायक मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी उद्धवजींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र -बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणारे नाहीत असे त्या म्हणाल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
मुंबई : देशात सध्या भाजपला जोरदार टक्कर देणारे पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेकडे पाहिलं जात आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ममता बॅनर्जी यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर संजय राऊत यांनीही या बैठकीत राजकारणावर चर्चा झाल्याचं ट्विटरवरुन सांगितलं आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ममता बॅनर्जी यांना भेटलो. राजकारण व बंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली.ममताजी आज सिध्दीविनायक मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी उद्धवजींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र -बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणारे नाहीत असे त्या म्हणाल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. त्यामुळे आगामी काळात भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन ममता बॅनर्जी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ममता बॅनर्जी यांना भेटलो.राजकारण व बेंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली. ममताजी आज सिध्दीिनायक मंदिरात गेल्या तेथे त्यांनी उद्धवजीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेंगाल हे लढणारे प्रदेश आहेत झुकणार नाहीत असे त्या म्हणाल्या. pic.twitter.com/3o8JndRkV0
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2021
आदित्य ठाकरे भेटीबाबत काय म्हणाले?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर त्या येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. आमच्यात एक वेगळे नाते आहे. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
उद्या शरद पवारांसोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या प्रकृतीमुळे भेटणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घोणार आहे. शरद पवार यांची देखील मी भेट घेणार आहे, त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला जो संदश द्यायचा आहे, तो मी देईन. मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार आहे”, ममता म्हणाल्या.
इतर बातम्या :