दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंचं काय कनेक्शन? साडेतीन वर्षांनंतर का होतेय SIT चौकशी?

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे नेमके कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंचं काय कनेक्शन? साडेतीन वर्षांनंतर का होतेय SIT चौकशी?
दिशा सालियन, आदित्य ठाकरे, सुशांत सिंह राजपूतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 1:09 PM

मुंबई : 7 डिसेंबर 2023 | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येप्रकरणी आता शिंदे सरकार एसआयटी चौकशी करणार आहे. त्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. डीआयजी रँकचे अधिकारी या SIT च्या कामाचं निरीक्षण करतील. दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी अनेक आमदारांनी केली आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात SIT चौकशीचे आदेश दिले होते. आता एसआयटी गठीत केली जाणार असून चौकशीला सुरुवात होणार आहे.

दिशा सालियानचा मुद्दा

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेत उचलण्यात आला होता. तेव्हा शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दिशा सालियनच्या मृत्यूचाही मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनीसुद्धा असा आरोप केला होता की सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर ‘AU’ नावाने 44 वेळा फोन आले होते. राहुल शेवाळे यांनी असाही दावा केला होता की बिहार पोलिसांच्या मते एयूचा अर्थ आदित्य आणि उद्धव ठाकरे असा आहे. तेव्हापासून AU नक्की कोण आहे, याच्या तपासाची जोरदार मागणी केली जाऊ लागली. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.

दिशा सालियान कोण होती?

कर्नाटकच्या उडुप्पी याठिकाणी जन्मलेली दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं. याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती. टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.

हे सुद्धा वाचा

दिशाचा मृत्यू कधी आणि कसा झाला?

9 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईतील मालाड इथल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. नंतर दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशीही जोडण्यात आलं होतं. कारण त्याच्या 5 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी सुशांतचं निधन झालं होतं. 28 वर्षीय दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. तर ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांनी याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केली होती. पोलिसांच्या मते याप्रकरणी त्यांना कोणतेच पुरावे मिळाले नाहीत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.