साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांत जोरदार राडा, 6 गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा

आज साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झालाय. दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरुन हा वाद झाल्याची माहिती मिळतेय. या मारहाणीत सनी भोसलेसह 6 जण जखमी झालेत. तर शिवेंद्रराजे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यासह 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांत जोरदार राडा, 6 गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा
उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 4:52 PM

सातारा : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे एकाच पक्षात अर्थात भाजपमध्ये असले तरी त्यांच्यातील शीतयुद्ध नेहमी पाहायला मिळतं. आज साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झालाय. दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरुन हा वाद झाल्याची माहिती मिळतेय. या मारहाणीत सनी भोसलेसह 6 जण जखमी झालेत. तर शिवेंद्रराजे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यासह 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dispute between MP Udayan Raje Bhosale and MLA Shivendra Raje supporters in Satara)

सातारा इथं बुधवारी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. उदनयराजे भोसले यांचे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झालं. नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील कार्यालयासमोर गाडी लावण्याच्या कारणावरुन हा वाद सुरु झाला. दोन्ही गटात झालेल्या हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या राड्यात धारदार शस्त्राचा वापर झाल्याची माहिती मिळतेय. यात उदयनराजे समर्थक सनी भोसलेसह 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेब्रुवारीत उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या भेटीला

22 फेब्रुवारी रोजी खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानकपणे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला होता. परंतु उदयनराजेंच्या एका नातेवाईकाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते स्वत: शिवेंद्रराजेंना भेटल्याची माहिती आहे.

उदयनराजे यांचे मामा नाशिकमध्ये असतात. त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणजेच उदयनराजेंच्या मामे भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी उदयनराजे हे शिवेंद्रराजे यांच्या सुरुची या निवासस्थानी गेले होते. या दरम्यान दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसून केवळ आमंत्रण देऊनच उदयनराजे तिथून निघाले असल्याची माहिती आहे.

‘मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल’

राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी 10 एप्रिलला दिला होता . त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते.

‘प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज लसींचा तुटवडा जाणवला नसता’

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते.

इतर बातम्या : 

पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही, पुणे पोलिसांकडून स्पष्ट

VIDEO : हा चित्रपट नाही, ही खरी हत्या, नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर हत्येचा थरार, सीसीटीव्हीत घटना कैद

Dispute between MP Udayan Raje Bhosale and MLA Shivendra Raje supporters in Satara

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.