भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच तब्बल 11 ठिकाणी बंडाची ठिणगी, वाचा A टू Z माहिती

भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण या घोषणेनंतर काही मतदारसंघांमध्ये महायुतीमधील अंतर्गत कलह उफाळून येण्याची चिन्हं आहेत.

भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच तब्बल 11 ठिकाणी बंडाची ठिणगी, वाचा A टू Z माहिती
भाजप
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 10:05 PM

भाजपनं 99 जणांची पहिली उमेदवार यादी घोषित केल्यानंतर जवळपास १५ ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी बंडाचे धुमारे फुटत आहेत. यंदा भाजपनं कोणतंही धक्कातंत्र न वापरता बहुतांश तिकीटं विद्यमान उमेदवारांनाच दिली आहेत. पण तरीही काही जागांवर स्थानिक समर्थक नाराज झाले आहेत. राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, पर्वती, कोथरुड, कल्याण पूर्व, नाशिक पूर्व, फुलंब्री, बेलापूर, सांगली, वर्सोवा आणि चांदवडसहीत इतर काही जागांवर नाराजी, बंडखोरीचे इशारे आणि काही ठिकाणी तिकीट जाहीर न झालेल्यांचा घोषणेचा आग्रह धरला जातोय. दरम्यान, भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. पण भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे कुठे-कुठे बंडाची ठिणगी पडली आहे ते जाणून घेऊयात. हे बंड शमलं नाही तर भाजपला त्याचं कडवं आव्हान होण्याची शक्यता आहे.

कुठे-कुठे बंडाची ठिणगी?

  1. पोलीस चौकीतल्या गोळीबारावरुन कल्याणमध्ये महायुतीत अजूनही आरोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस चौकीत शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्याच गणपत गायकवाडांच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिल्यानं शिंदे गटानं विरोध केलाय.
  2. अहिल्यानगरच्या राहुरीत भाजपनं पुन्हा शिवाजी कर्डिलेंना तिकीट दिलं. गेली 3 टर्म भाजपचं तिकीट मिळवण्यात कर्डिले यशस्वी ठरले आहेत. 2009, 2014 कर्डिले जिंकले. 2019 ला राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंकडून पराभव झाला. मात्र यंदा त्यांनाच तिकीट गेल्यानं भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदमांनी नाराजी व्यक्त केली आहे. यंदा राहुरीतून कदमांचे पुत्र सत्यजित कदम इच्छूक होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते एकनिष्ठ राहिले आहेत. भाजपनं दिलेला शब्द न पाळल्यानं ते बंडाच्या तयारीत आहेत. “कार्यकर्त्यांमुळे मी नेता झालो. त्यांना विचारूनच पुढचा निर्णय घेणार. दोन दिवसात निर्णय घेणार. मागील निवडणुकीत पक्षहितासाठी थांबलो. मात्र पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. सत्यजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी ठामपणे उभा राहणार”, असं चंद्रशेखर कदम म्हणाले आहेत.
  3. सांगलीत भाजपनं सुधीर गाडगीळांना पुन्हा संधी दिलीय. त्यावर नाराज भाजपचे झेडपी सदस्य शिवाजी डोंगरेंनी अपक्ष अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. 2014 आणि 2019 ला गाडगीळ सांगलीतून भाजपचे आमदार राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी यापुढे आपण निवडणूक लढणार नाही, असं पत्रक गाडगीळांनी जाहीर केलं होतं. पण त्यांनाच भाजपने उमेदवारी दिल्याने नाराजी उफाळून आलीय.
  4. पुण्याच्या पर्वतीमधून भाजपनं पुन्हा एकदा माधुरी मिसाळांना तिकीट दिलंय. त्याविरोधात नाराज श्रीनाथ भिमालेंनी येत्या दोन दिवसात निर्णय घेण्याचं म्हणत इशारा दिला आहे. नाराजीच्या शक्यतेमुळेच यंदा आचारसंहितेआधी भिमालेंना भाजपनं महामंडळावर नियुक्ती दिली होती. पण ती नियुक्ती नाकारत भिमाले तिकीटासाठी आग्रही होते. 2009, 2014, 2019 अशा ३ टर्म पर्वतीत भाजपच्या माधुरी मिसाळ आमदार राहिल्या आहेत
  5. नाशिक पश्चिममध्ये भाजपनं सीमा हिरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज स्थानिक भाजपच्या काही लोकांनी थेट संजय राऊतांची भेट घेतली. 2014, 2019 ला भाजपच्या आमदार राहिलेल्या सीमा हिरेंना तिसऱ्यांदा भाजपनं उमेदवारी दिलीय.
  6. संभाजीनगरच्या फुलंब्री मतदारसंघात भाजपनं अनुराधा चव्हाणांना तिकीट दिलंय. त्याला विरोध करत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवारांनी अपक्ष लढण्याची घोषणा केलीय. फुलंब्री मतदारसंघ युतीत भाजपच्या वाटयाला राहिलाय. 2014 आणि 2019 मध्ये इथून भाजपचे हरिभाऊ बागडे आमदार होते.
  7. श्रीगोंद्यात भाजपनं प्रतिभा पाचपुतेंनी तिकीट देताच इच्छूक सुवर्णा पाचपुतेंच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. मूळ भाजपचे सोडून बाहेरुन आलेल्यांना संधी मिळते म्हणत सुवर्णा पाचपुतेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.
  8. 2014 ला राष्ट्रवादीतून आलेल्या बबनराव पाचपुतेंना भाजपनं तिकीट दिलं होतं. नंतर 2019 ला संधी देण्यात आली, आणि यंदा पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंनाच संधी मिळाल्यानं इतर भाजप समर्थक नाराज आहेत.
  9. चांदवडमध्ये दोन भावांमध्येच तिकीटावरुन नाराजी रंगली आहे. आपल्याऐवजी यंदा भाऊ केदा आहेरांना भाजपनं संधी द्यावी, असं म्हणणाऱ्या राहुल आहेरांनाच भाजपनं पुन्हा संधी दिलीय. तिकीट घोषणेनंतर राहुल आहेर फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. दुसरीकडे तिकीट न मिळाल्यानं त्यांचे बंधू केदा आहेर मात्र भावूक झालेले पाहायला मिळाले. घरात भाऊबंदकी होऊ नये म्हणून स्वतः राहुल आहेरांनी तिकीट नाकारुन आपल्या भावाची शिफारस केल्याची माहिती आहे. यानंतर केदा आहेर यांनीही फडणवीसांनी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे चांदवडमध्ये भाजपने उमेदवारी बदलणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
  10. नवी मुंबईतल्या बेलापूरमधून भाजपने मंदा म्हात्रेंना तिकीट दिलंय. त्याविरोधात इच्छूक संदीप नाईकांनी पदाधिकारी मेळावा बोलवत म्हात्रेंच्या उमेदवारीला विरोध केलाय. गणेश नाईकांना भाजपनं ऐरोलीतून तिकीट दिलंय. मात्र मुलगा सुद्धा बेलापूरमधून इच्छूक असल्यानं फडणवीस यावर काय तोडगा काढतात हे पाहणं महत्वाचं असेल.
  11. सावंतवाडी विधानसभेत शिंदे गटाच्या केसरकरांविरोधात स्थानिक भाजप आक्रमक झाले आहेत. पक्षानं तिकीट न दिल्यास भाजपच्या विशाल परबांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिलाय. याआधीच राजन तेलींनी केसरकरांविरोधात ठाकरे गटात प्रवेश केलाय.
Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.