आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपचा स्कूटी आणि कारचा फंडा; वरळीच्या जांबोरी मैदानात…
वरळीत दहीहंडी, नवरात्री उत्सवाचे आयोजन केल्यानंतर आता भाजपने वरळीतील जांबोरी मैदानात दिपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.
मुंबई : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा बालेकिल्ला काबीज करम्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विविध सणांच्या माध्यमातून वरळीकरांना आपल्याकजे आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहे. वरळीत दहीहंडी, नवरात्री उत्सवाचे आयोजन केल्यानंतर आता भाजपने वरळीतील जांबोरी मैदानात दिपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. भाजपचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपने स्कूटी आणि कारचा फंडा वापरला आहे.
वरळीतल्या जांबोरी मैदानवर (Jambori Maidan) भाजपने मराठमोळ्या दीपोत्सवाचं आयोजन केले आहे. यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात,ढंगात साजरी करायची आहे. आपली खाद्य संस्कृती,आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे, आपण सर्व मुंबईकर आमंत्रित आहात दि. १९ ॲाक्टोबर ते २३ ॲाक्टोबर स्थळ- जांबोरी मैदान,वरळी. #आपला_मराठमोळा_दिपोत्सव. असे ट्विट करत भाजपने या कार्यक्रमाची माहिती दिली होती.
यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात,ढंगात साजरी करायची आहे.आपली खाद्य संस्कृती,आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे, आपण सर्व मुंबईकर आमंत्रित आहात दि. १९ ॲाक्टोबर ते २३ ॲाक्टोबर स्थळ- जांबोरी मैदान,वरळी. #आपला_मराठमोळा_दिपोत्सव. pic.twitter.com/3NXH9BxtAS
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) October 14, 2022
आजपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. स्कूटी आणि कार हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे. दिपोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
येथे वेशभूषा स्पर्धा देखील आयोजीत केली जाणार आहे. विजेत्यांना स्कूटी आणि कार भेट म्हणून दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपने भव्य स्टेज उभारला आहे. तसेच बक्षिस म्हणून दिली जाणारी स्कूटी आणि कार या स्टेजवर ठेवण्यात आली आहे.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, याच मतदार संघावर आता भाजपचा डोळा आहे. हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.