AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये दादा का स्टाईल है! बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका!

अजित पवार यांनी आज सकाळी बारामतीत (Ajit Pawar visits Baramati) जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

ये दादा का स्टाईल है! बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका!
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 2:16 PM

बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी बारामतीत (Ajit Pawar visits Baramati) जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. अजित पवार म्हणाले, “नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. माझं- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरी मुलाहिजा बाळगू नका”

वर्षानुवर्षे नदीपात्रासह ओढे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळं अतिवृष्टी किंवा पुराच्या काळात मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांसह ओढ्याभोवतालची अतिक्रमणे त्वरीत काढावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याचवेळी अतिक्रमणे काढताना कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका, भले ते अतिक्रमण अजित पवारांचे असले तरी काढून टाका, असं सांगत अजितदादांनी अधिकाऱ्यांना तत्पर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. (Ajit Pawar visits Baramati Dada style)

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान अजित पवार यांनी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधत अधिकारी वर्गालाही सूचना दिल्या. पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांचे खोलीकरण करण्यासह नदी आणि ओढ्यांच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्याची सूचना त्यांनी केली. नदी अथवा ओढ्यावर अजित पवारांचे अतिक्रमण असले तरी ते काढून टाका, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.

सात वाजता भिगवणमध्ये अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी भिगवण रस्त्यासह तांदुळवाडी, चांदगुडे वस्ती, खंडोबानगर, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, पाहुणेवाडी, गुणवडी परिसराची पाहणी केली. त्यानंतर सणसर, जंक्शन, निमगाव केतकी येथे पाहणी करून त्यांनी उजनी धरण परिसरात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

अजित पवार हे आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही कामाबाबत तत्पर निर्णय ही खासियत असलेल्या अजित पवार यांनी आज नदी खोलीकरणासारख्या महत्वपूर्ण कामाबाबत सूचना केल्याच.. त्याचवेळी अजित पवारांनी केलेलं अतिक्रमण असलं तरी मुलाहिजा बाळगू नका असा ‘दादा स्टाईल’ आदेश दिलाय. त्यामुळं येणाऱ्या काळात नदीपात्रांसह ओढेही मोकळा श्वास घेतील, असं म्हणायला हरकत नाही. (Ajit Pawar visits Baramati Dada style)

संबंधित बातम्या 

भल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश 

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.