Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presidential Election 2022 Results : द्रौपदी मुर्मूंच्या पारड्यात विरोधकांचीही मते; केवळ 17 खासदारांचंच नाही तर 104 आमदारांचंही क्रॉस व्होटिंग

Presidential Election 2022 Results : द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यानंतर भाजपने देशभर जल्लोष केला. तब्बल 20 हजार लाडू वाटून हा जल्लोष करण्यात आला. देशभरातील भाजपच्या कार्यालयाबाहेर ढोलताशे वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य करून आनंद व्यक्त केला.

Presidential Election 2022 Results : द्रौपदी मुर्मूंच्या पारड्यात विरोधकांचीही मते; केवळ 17 खासदारांचंच नाही तर 104 आमदारांचंही क्रॉस व्होटिंग
द्रौपदी मुर्मूंच्या पारड्यात विरोधकांचीही मते; केवळ 17 खासदारांचंच नाही तर 104 आमदारांचंही क्रॉस व्होटिंग Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 7:56 AM

नवी दिल्ली: एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election 2022 Results) विजय झाला आहे. येत्या 25 जुलै रोजी त्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असणार आहेत. त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रचंड प्रमाणात क्रॉस व्होटिंग झालं आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे. देशभरातील 17 खासदार आणि 104 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत मुर्मू यांना मतदान केलं आहे. त्यामुळे मुर्मू यांना जेवढे मते मिळणार होते, त्याच्यापेक्षा अधिक मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे भाजपही आश्चर्यचकीत झाला आहे. विशेष म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी व्यक्ती पहिल्यांदाच बसणार असल्यामुळे अनेक पक्षातील आमदार आणि खासदारांनी मुर्मू यांना भरभरून मतदान केल्याचं दिसून आलं आहे.

या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 4 हजार 754 मतांपैकी 2,824 मते मिळाली. त्यात 540 खासदारांच्या मतांचाही समावेश आहे. तर यशवंत सिन्हा यांना 1,187 मते मिळाली. त्यात खासदारांची 208 मते आहेत. देशात सर्वाधिक क्रॉस व्होटिंग आसाममध्ये झाली आहे. आसाममध्ये 22 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली आहे. त्यानंतर मध्यप्रदेशचा नंबर लागतो. मध्यप्रदेशात 19 आमदारांनी, राजस्थान आणि मेघालयात प्रत्येकी 16 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली आहे. झारखंड आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 10 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली आहे. महाराष्ट्रात 17, छत्तीसगडमध्ये 6, गोव्यात चार, हिमाचल प्रदेशात दोन आणि हरियाणात एका आमदाराने क्रॉस व्होटिंग केलं आहे. तसेच 17 खासदारांनीही पार्टी लाईनच्या पलिकडे जाऊन क्रॉस व्होटिंग केलं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपचा देशभर जल्लोष

दरम्यान, द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यानंतर भाजपने देशभर जल्लोष केला. तब्बल 20 हजार लाडू वाटून हा जल्लोष करण्यात आला. देशभरातील भाजपच्या कार्यालयाबाहेर ढोलताशे वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य करून आनंद व्यक्त केला. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात दिल्लीत मोठी रॅलीही काढण्यात आली. यावेळी भाजपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

ऐतिहासिक विजय

मुर्मू यांचा विजय हा ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण असल्याचं भाजपने सांगितलं. मुर्मू यांच्या कार्यकाळात देशासाठी गौरवास्पद असेल अशी आशाही भाजपने व्यक्त केली. मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. तसेच त्यांच्याशी चर्चाही केली. अमित शहा यांनी ट्विट करून मुर्मू यांचा विजय हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.