भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून विरोधकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यात भाजपच्या किंवा भाजप समर्थक पक्षाच्या एकाही नेत्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. (ed raids against bjp's political opponents?, read special report)

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:53 PM

मुंबई: केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून विरोधकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यात भाजपच्या किंवा भाजप समर्थक पक्षाच्या एकाही नेत्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यातही ज्या नेत्यांनी भाजपला विरोध केला त्यांनाच नोटीस बजावण्यात आली आहे. मग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रासप आमदार रत्नाकर गुठ्ठे असो की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या सर्वांनी भाजपला विरोध करताच त्यांच्यामागे ईडी लावण्यात आली. त्यामुळे भाजपच्या कार्यपद्धतीवरच शंका घेतली जात आहे. या सहाही नेत्यांनी भाजपला नेमका काय विरोध केला? आणि त्यांच्यामागे ईडी का लावण्यात आली? याचा घेतलेला हा धांडोळा. (ed raids against bjp’s political opponents?, read special report)

पवारांना तिसरी आघाडी, मोदी विरोध भोवला?

शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. देशातील अनुभवी आणि अभ्यासू राजकारणी आहेत. सर्वच राजकीय पक्षात त्यांची उठबस असून कोणत्याही क्षणी राजकारण फिरवण्याची त्यांची क्षमता आहे. पवारांनाही सप्टेंबर 2019 मध्ये ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यावेळी राज्यात भाजपचं सरकार होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे ईडीने पवारांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. पवारांना आलेल्या या नोटीशीमुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. पवारांनीही ईडी कार्यालयात स्वत: जाणार असल्याचं सांगितल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. राजकीय वातावरण तापलेलं असतानाच या प्रकरणात ईडीही बॅकफूटवर गेली होती. सध्या तुमच्या चौकशीची गरज नाही, असं सांगत ईडीने पवारांना चौकशीसाठी येण्यास मनाई केली होती.

‘या’ कारणाने कारवाई?: शरद पवार यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांना विरोध केला होता. तसेच पवारांनी राष्ट्रीय स्तरावर सर्व छोट्या, प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांनी डाव्यांपासून मायवती आणि ममतांशीही बोलणी सुरू केली होती. तसेच तिसरी आघाडी राष्ट्रीय स्तरावर होत नसेल तर राज्यात जो पक्ष मोठा असेल त्याच्या छत्राखाली येऊन सर्वांनी भाजपविरोधात लढण्याचं सूत्रंही त्यांनी मांडलं होतं. त्यामुळे भाजपच्या तंबूत खळबळ उडणं सहाजिकच होतं. या सर्व पार्श्वभूमीवर पवारांना पायबंद घालावा म्हणून त्यांना ईडीने नोटीस पाठवली असावी, असं राजकीय विश्लेषक सांगतात. राज्यातील भाजप सरकारला राष्ट्रवादीकडूनच अधिक विरोध होत होता. भाजपला प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीकडून एक्सपोज केलं जात होतं. शिवाय राज्यात राष्ट्रवादीचं प्राबल्य वाढू लागल्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर जावी म्हणूनही पवार काका-पुतण्यांना ईडीने तेव्हा नोटीस बजावली असावी, असं जाणकार सांगतात.

सरनाईकांना अर्णव गोस्वामी प्रकरण भोवलं?

ईडीने 24 नोव्हेंबर 2020 रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी हे छापे टाकण्यात आले होते. सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आणि आमदार म्हणून ओळखले जातात.

‘या’ कारणाने कारवाई?: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपाला लक्ष्य केले होते. सरनाईक यांनी अन्वय नाईक प्रकरण लावूनच धरले होत. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरावाही केला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आल्याने पत्रकार अर्णव गोस्वामी अडचणीत आले होते. तसेच कंगना रणौत आणि अर्णव यांच्याविरोधातही त्यांनी विधानसभेत हक्कभंग आणला होता. रणौत आणि अर्णव गोस्वामी ही भाजपचीच माणसं असल्याने सरनाईक यांनी एक प्रकारे भाजपलाच अडचणीत आणल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.

वेसन घालण्यासाठी अजितदादांना ईडीचा धाक?

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कर्ज वाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अजित पवारांनाही ईडीची नोटीस आल्याची जोरदार चर्चा होती. पण पवार यांनीच मला ईडीची नोटीस आली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, ईडीने गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी नाकारलं नव्हतं.

‘या’ कारणाने कारवाई?: अजित पवार हे राज्यातील बडे नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा अधिक होल्ड आहे. अजित पवारांची आक्रमक कार्यशैली आणि विकासकामांमुळे भाजपला पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरणे कठिण जात असल्याने त्यांना वेसन घालण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

राज यांना ईव्हीएम विरोध भोवला?

कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरेंना ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यांना 22 ऑगस्ट 2019 रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. राज या चौकशीला सामोरेही गेले होते.

‘या’ कारणाने कारवाई?:  राज ठाकरे यांनी ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यास कडाडून विरोध केला होता. ईव्हीएमद्वारे मतदान घेण्याची पद्धत बंद होण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं होतं. त्यासाठी ते पश्चिम बंगालला जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटले होते. त्याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर आणि कारभारावर सातत्याने टीका केली होती. नोटाबंदीपासून ते काळ्या पैशापर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी मोदींना नुसतेच घेरले नाही तर भाजप सरकारला एक्सपोज केलं होतं. त्यामुळेच राज हे भाजपच्या रडारवर होते. त्या रागातूनच त्यांच्यावर ईडीची कारवाई केल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

भाजपला खिंडार पाडू नये म्हणून खडसेंना पायबंद?

महाराष्ट्रातील गावखेड्यात भाजपचं जाळं निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसे यांना ईडीची नोटीस पाठवल्याची काल शुक्रवारी दिवसभर चर्चा होती. पण खडसे यांनी आपल्याला अद्याप अशी नोटीस मिळाली नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र, खडसे यांना नोटीस आली तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

‘या’ कारणाने कारवाई?: खडसे राष्ट्रवादीत आल्याने त्यांना नोटीस बजावली जाऊ शकते. तसेच जळगावमधील कथित बीएचआर घोटाळा त्यांनी बाहेर काढला असून त्याच भाजप नेते गिरीश महाजन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खडसे यांच्या या घोटाळ्यावर कारवाई होण्याआधीच त्यांची ईडी मार्फत कारवाई करून त्यांना अडचणीत आणलं जाऊ शकतं. खडसे यांनी भाजपमध्ये असताना आणि भाजप सोडल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. फडणवीस यांची इमेज किल करण्याचा प्रयत्न खडसे करत आहेत. शिवाय भाजपमधील आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत खेचून ते भाजपला मोठं खिंडार पाडू शकतात. त्याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपासून नगरपालिकेपर्यंतची सत्ता ते राष्ट्रवादीकडे खेचून आणू शकत असल्याने त्यांना रोखण्यासाठीही ईडीचा वापर होऊ शकतो, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

गुट्टेंना पवारांची भेट भोवली?

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आठ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत रासपचे अध्यक्ष महादेव जानकरही उपस्थित होते. या भेटीनंतर अवघ्या काही दिवसातच गुट्टे यांच्या कार्यालयावर ईडीची धाड पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पवारांची भेट घेतल्याने तर गुट्टे यांना धाकात ठेवण्यासाठी तर ईडीने कारवाई केली नाही ना? अशी चर्चा सध्या जोरात रंगली आहे. शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी गुट्टे यांच्या अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता ईडीने जप्त केलीय. रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (ed raids against bjp’s political opponents?, read special report)

‘या’ कारणाने कारवाई?: कोर्टानं क्रशिंगला परवानगी दिली तरी कारखान्याला ज्या अटी, शर्थी लावल्या होत्या, त्या जाचक असल्याचा दावा गुट्टे यांनी केला होता. या अटी साखर आयुक्तांनी लावलेल्या आहेत. त्या काढाव्यात अशी विनंती करण्यासाठी गुट्टेंनी अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. अजित पवारांच्या भेटीवरच जानकर-गुट्टे थांबले नाहीत तर ते लगेचच शरद पवारांच्याही भेटीला गेले होते. तिथंही त्यांनी गंगाखेड शुगरवर लादलेल्या जाचक अटींची तक्रार केल्याचं सांगितलं होतं. या भेटीनंतर गुट्टे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चाही रंगली होती. त्यानंतर ही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (ed raids against bjp’s political opponents?, read special report)

संबंधित बातम्या:

काँग्रेसची पहिली मोठी घोषणा, कोल्हापूरची निवडणूक स्वतंत्र लढणार

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे

रत्नाकर गुट्टेंची तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त, गंगाखेडच्या आमदाराला ED चा मोठा दणका

(ed raids against bjp’s political opponents?, read special report)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.