आठवेळा आमदार, तरीही साधी राहणीमान; जाणून घ्या कोण आहेत के. सी. पाडवी?

राज्याचे आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांची राजकीय कारकिर्द भली मोठी आहे. एक वेळा अपक्ष आणि सातवेळा काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले आहेत. (eight-time MLA to Cabinet minister, know about KC Padvi)

आठवेळा आमदार, तरीही साधी राहणीमान; जाणून घ्या कोण आहेत के. सी. पाडवी?
k.c. padvi
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 1:09 PM

मुंबई: राज्याचे आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांची राजकीय कारकिर्द भली मोठी आहे. एक वेळा अपक्ष आणि सातवेळा काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले आहेत. त्या मानाने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद उशिरानेच मिळालं आहे. आठवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पाडवी यांचं नाव सध्या विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. अत्यंत साधी राहणीमान असलेला आणि प्रचंड लोकसंपर्क असलेल्या पाडवींच्या राजकीय कारकिर्दीचा मांडलेला हा लेखाजोखा. (eight-time MLA to Cabinet minister, know about KC Padvi)

कौटुंबिक पार्श्वभूमी

अॅड. के. सी. पाडवी यांचा जन्म 3 मार्च 1957 रोजी नंदूरबार जिल्ह्यातील अक्रणी महाल तालुक्यातील असली गावी झाला. त्यांचं शिक्षण बीए, एलएलएमपर्यंत झालं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह आदिवासी भाषा त्यांना अवगत आहेत. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. शेती आणि वकिली हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा त्यांचा मतदारसंघ आहे.

कोण आहेत के.सी. पाडवी?

के.सी. पाडवी हे जवळपास 1990 पासून अक्कलकुव्याचे आमदार आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवलेलं आहे. काँग्रेस निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. सात वेळेस ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत. आदिवासी समाजाचे आक्रमक नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

जनता दलापासून राजकारणास सुरुवात

पाडवी यांचा राजकीय प्रवास जनता दलापासून सुरू झाला. त्यांनी 1990पर्यंत जनता दलाचं कार्य केलं. त्यानंतर त्यांनी 1991 पासून काँग्रेसमध्ये काम केलं. परंतु, 1995मध्ये तिकिट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसला वाहून घेतलं.

आठव्यांदा आमदार

पाडवी हे नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर सातव्यांदा निवडून आले आहेत. या मतदारसंघातील 95 टक्के मतदार आदिवासी असून हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. विशेष म्हणजे 1995 साली या मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हा मतदारसंघ तसा दुर्गम भागातील आहे. परंतु, प्रचंड जनसंपर्क, कार्यकर्त्याची मोठी फळी आणि मतदारांच्या समस्या तात्काळ सोडवणं या गोष्टींमुळे ते सतत निवडून येत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून आमदार के.सी पाडवी यांनी उमेदवारी दिली होती. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही.

विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आदिवासी मंत्री कागदा चांद्या पाडवी म्हणजेच के. सी. पाडवी (K C Padvi) यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. पाडवी हे काँग्रेस निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अलिकडेच सोनियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, आदिवासी, मागास वर्गासाठी खास निधीची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पाडवींना अध्यक्ष केलं तर आदिवासी समाजात चांगला मेसेज पोहोचेल असं गणित मांडलं जात आहे. पाडवी विधानसभा अध्यक्ष झाल्यास खान्देशकडे तिसऱ्यांदा हे पद जाईल. यापूर्वी 1990 ते 1995 या कालावधीत मधुकरराव चौधरी यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद होतं. तर, 1999 ते 2004 पर्यंत अरुणभाई गुजराथी यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद होतं. त्यामुळे पाडवी यांच्याकडे या पदाची धुरा जातेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्नी पराभूत

जानेवारी 2020मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हेमलता के. पाडवी यांना पराभवाचा धक्का बसला. तोरणमाळ गटात शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी हेमलता पाडवींना पराभूत केलं.

पाडवी आणि राज्यपाल वाद?

मंत्रीपदाची शपथ घेताना के.सी.पाडवी यांचा राज्यपालांसोबत वाद झाला होता. शपथ घेताना जो मजकुर ठरवून दिलेला होता, त्यात पाडवींनी सोनिया, राहुल गांधींचीही नावं जोडली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाराज झाले आणि त्यांनी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला भाग पाडलं. पुन्हा असं न करण्याचा इशाराही इतर नेत्यांना देण्यात आला. (eight-time MLA to Cabinet minister, know about KC Padvi)

संबंधित बातम्या:

मोदी लाटेतही निवडून आले, आता थेट मंत्री; वाचा, सुनील केदार यांचा राजकीय प्रवास

पवार घराण्यातील चौथी पिढी, पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग; जाणून घ्या रोहित पवारांबद्दल

रिक्षाचालक ते नगरविकास मंत्री; वाचा, ‘ठाणे’दार एकनाथ शिंदेंचा प्रवास

(eight-time MLA to Cabinet minister, know about KC Padvi)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.