Eknath Khadse : रोहिणी खडसेंचा पराभव छुप्या युतीमुळंच, गिरीश महाजन यांनी भाजप विकली, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर
बोदवड नगरपंचयातीची निवडणूक संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर बोदवड नगरपंचायतीच्या निकालावरुन टीका केली होती. बोदवड नगरपंचयातीची निवडणूक संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून छुपी युती होती त्यामुळं रोहिणी खडसे यांचा पराभव झाला, असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मी भाजपमध्ये असताना एकट्याने जिल्ह्यात भाजप उभी केली. भाजप एकट्याच्या बळावर लढत होती. आता गिरीश महाजन दुसऱ्याची मदत घेवून भाजपला धुळीत घालत आहेत, अशी टीका खडसे यांनी केली.
भाजप एकट्याच्या जीवावर उभी केली
एकनाथ खडसे यांनी छुपी युती विधानसभा निवडणुकी पासून अनेक नेत्यांची होती त्यामुळेच रोहिणी खडसे यांचा पराभव झाला असल्याचा आरोप केला. मी भाजपमध्ये असताना एकट्याने जिल्ह्यात भाजप उभी केली. भाजप एकट्याच्या बळावर लढत होती. आता गिरीश महाजन दुसऱ्याची मदत घेवून भाजप धुळीत घालत आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
जळगाव जिल्ह्यात भाजप विकली
जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी छुप्या युतीमुळे भाजपा विकून टाकली आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकीत आम्ही आधीच पराजय स्वीकारला. भाजपाची इतकी वाईट परिस्थिती जिल्ह्यात कधीही नव्हती. भाजपला दुसऱ्याचा सहारा घेऊन एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी लढावे लागते ही चिंताजनक बाब असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
गिरीश महाजन काय म्हणाले होते?
बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काही म्हणायचे ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवड मध्ये ते हरले आता कारण कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची, असा प्रकार खडसे यांचा सुरू असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
इतर बातम्या:
शिवसेना भाजप युतीवर मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा बोलले, नितीन गडकरीच हा पूल बांधू शकतील कारण…
Tipu Sultan: दंगल करून दाखवाच, इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊत यांचं भाजपला आव्हान
Ekanth Khadse gave answer to Girish Mahajan and said he sold bjp in Jalgaon