मोठी बातमी : एकनाथ खडसेंवर क्रिटीकल शस्त्रक्रिया, बॉम्बे रुग्णालयात दाखल, वकिलाची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली.
पुणे जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित आहेत. खडसे हे आजारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली. खडसे यांच्यावर क्रिटीकल ऑपरेशन होत आहे, त्यासाठी ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, अशी माहिती एकनाथ खडसेंच्या वकिलांनी दिली.
दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत. हे सर्व 2016 चं प्रकरण असून त्यावेळी एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.
अंजली दमानियांचं टीकास्त्र
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंच्या या माहितीनंतर टीकास्त्र सोडलं आहे. एकनाथ खडसे हे खोट्यावर खोटं बोलत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
SHOCKING
Lies after Lies
Eknath Khadse’s lawyer has made a statement before the Hon’ble Sessions court that Shri Khadse is PERMANENTLY DISABLED???
Also that he has been admitted in an ICU and to undergo a LIFE SAVING SURGERY?
Lies only to avoid physical appearance at court?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 6, 2021
एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार?
माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती.
ईडीच्या चौकशीसाठी सहकार्य करायला तयार: एकनाथ खडसे
ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. चौकशीवेळी आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.
संबंधित बातम्या
मोठी बातमी: एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात, प्रकृती स्थिर
एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय: राज ठाकरे
VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?
“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”