बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हटल्यावर चौकशा लावल्या : एकनाथ खडसे

"भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावं लागेल", असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं (Eknath Khadse allegations on BJP).

बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हटल्यावर चौकशा लावल्या : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 5:40 PM

नाशिक : “भाजपला शेटजी-भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी, भटांचा पक्ष अशी या पक्षाची ओळख होती. मात्र ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करुन पुसण्याचा प्रयत्न केला”, अशी प्रतिक्रिया भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली (Eknath Khadse allegations on BJP).

“भाजपला पूर्वी मारवाडी, भट-ब्राह्मणांचा, शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी ओळख होती. त्या कालखंडापासून आम्ही काम करतोय. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत केली. त्यामुळे शेटजी-भटजीचा जो चेहरा होता तो बहुजन समाजाचा चेहरा करण्याचा प्रयत्न केला”, असं एकनाथ खडसे म्हणाले (Eknath Khadse allegations on BJP).

“२०१४ नंतर मात्र मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावं लागेल”, असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं.

“भाजपमध्ये गेले चारवर्ष मी भीतीच्या सावटाखाली वावरत होतो. कधी माझ्यामागे ईडी, कधी अँटीकप्शन तर कधी विनयभंगासारखी केस दाखल होईल, याची मला नेहमीच चिंता राहायची. आता सर्वांमधून मी निर्दोष सुटलो आहे. या सर्वातून बाहेर आल्यानंतर माझं टेन्शन कमी झालेलं आहे. आता इतरांना टेन्शन देण्याचं काम सुरु करणार आहे”, असा टोला खडसेंनी लगावला.

“भाजपमधील काही आमदार माझ्या संपर्कात आहेत. पक्षांतर बंदी कायद्यामुळे सध्या पक्षांतर करणं अडचणीचं आहे. त्यामुळे या पक्षातून त्या पक्षात जाणं अडचणीचं आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागेल. परत निवडणुकीला सामोरे जावे लागेल. विधानसभेच्या निवडणुका होऊन अवघे 11 महिने झालेले आहेत. पुढच्या चार वर्षांसाठी निवडणुका होणं योग्य वाटत नाही”, असं खडसे म्हणाले.

‘भाजपात पक्षप्रवेश करणाऱ्यांना चंद्रकांत पाटलांनी कुल्फी आणि चॉकलेटच दिले’

“चंद्रकांत दादा यांनी नाथाभाऊंना कुल्फी देणार की चॉकलेट? असा सवाल केला आहे. पण काही द्यावं किंवा देऊ नये, यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. याशिवाय मी काहीच मागितलेलं नाही”, असं स्पष्टीकरण खडसेंनी दिलं आहे.

“कुल्फी आणि चॉकलेट देऊन पक्षामध्ये लोक येत असतील असं वाटत असेल तर आतापर्यंत भाजपमध्ये वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येकाला कुल्फी आणि चॉकलेटं दिली म्हणूनच ते पक्षात आले होते, असं त्यांच्या बोलण्यावरुन वाटतं”, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार, खडसेंचं फडणवीसांकडे बोट

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.