कोणी पद देणार म्हणून नाथाभाऊ पक्षप्रवेश करत नाही : एकनाथ खडसे

माझ्या मतदारसंघातील विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी, असेही एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse comment before joining NCP)

कोणी पद देणार म्हणून नाथाभाऊ पक्षप्रवेश करत नाही : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 12:01 PM

मुंबई : “कोणी काही पद देणार म्हणून नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही,” असा खोचक टोला भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला. “माझ्या मतदारसंघातील विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी,” असेही एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse comment before joining NCP)

“कोणी काही पद देणार आहे म्हणून नाथाभाऊ पक्ष प्रवेश करत नाहीत. माझ्या मतदारसंघात मी मंजूर केलेले काही विकास काम मोठ्या प्रमाणात पेडींग आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात फार मोठी विकासकाम अशीच आहेत. या विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी आहे. त्यामुळे सरकारसोबत राहून मी आता ही काम करणार आहेत. यासाठी आजचा हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशापूर्वी दिली.

गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होणार आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.

दोन दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा

गेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. “मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले.

“काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला,” असं खडसे म्हणाले.

मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं.(Eknath Khadse comment before joining NCP)

संबंधित बातम्या : 

‘त्यांनी खडसेंना न्याय दिला नाही, मग तुमची काय गत होईल? आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला’

‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ हा भाजपचा नारा; देशात फूट पाडण्याचा प्रयत्न- संजय राऊत

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.