Eknath Khadse : गुलाबराव पाटलांनी 30 वर्षांचा हिशोब काढला, 40 वर्षात एकदाही हरलो नाही, एकनाथ खडसेंनी दाखवला आरसा

नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse : गुलाबराव पाटलांनी 30 वर्षांचा हिशोब काढला, 40 वर्षात एकदाही हरलो नाही,  एकनाथ खडसेंनी दाखवला आरसा
Gulabrao Patil_Eknakth Khadse
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 1:24 PM

मुंबई: शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत डिवचलं होतं. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे. हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे. ज्या वेळेस तीस वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला लोक निवडून देतात त्यावेळी त्यानं काम केल्याशिवाय देत नाहीत. मला राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत. मी चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलेलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केलंय, असं एकनाथ खडसे म्हणाले.

हेमा मालिनी का आठवली लक्षात आलं नाही

हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केलाय.

इतर बातम्या:

देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक; दरी मिटणार?

Gulabrao Patil: मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले, विरोधकांनी येऊन पाहावं, गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना डिवचलं

Eknath Khadse gave answer to Gulabrao Patil statement in political rally

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.