Eknath Khadse Road Show Live | राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे जळगावला, रस्त्यात कार्यकर्त्यांकडून स्वागत सोहळा

फक्त मुक्ताईनगरच नाही तर मुंबई ते जळगाव रोडवर खडसेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Eknath Khadse Road Show Live Update)

Eknath Khadse Road Show Live | राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे जळगावला, रस्त्यात कार्यकर्त्यांकडून स्वागत सोहळा
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 10:57 AM

मुंबई : गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर ते मुंबईहून जळगावसाठी रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठिक-ठिकाणी खडसेंच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. विशेष म्हणजे फक्त मुक्ताईनगरच नाही तर मुंबई ते जळगाव रोडवर खडसेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Eknath Khadse Road Show Live Update)

एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पहिल्यांच्या त्यांच्या मतदारसंघात म्हणजे मुक्ताईनगर येथे जात आहेत. त्यांच्या परतीचा हा दौरा व्हाया रोड असणार आहे. या दौऱ्यादरम्यान ठिक-ठिकाणी खडसेंचं स्वागत केलं जाणार आहे. मुंबईतील घाटकोपर, भांडूप, ठाणे, कल्याण, भिवंडी यासह 14 ठिकाणी त्यांचे स्वागत होणार आहे. त्यावेळी त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षात स्वागत करतील. ते ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडेही झळकताना पाहायला मिळत आहेत.

?LIVE UPDATE?

[svt-event title=”खडसेंच्या समर्थकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ देत सन्मान” date=”24/10/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसेंचं विक्रोळी आणि मुलुंड येथे जंगी स्वागत ” date=”24/10/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

एकनाथ खडसेंच्या स्वागताची ठिकाणं 

  • घाटकोपर
  • मुलुंड टोलनाका
  • ठाणे
  • कल्याण फाटा
  • पडघा
  • शहापूर
  • कसारा
  • इगतपुरी
  • घोटी
  • नाशिक
  • ओझर
  • पिंपळगाव बसवंत
  • चांदवड
  • मालेगाव
  • धुळे
  • पारोळा
  • एरंडोल
  • जळगाव

एकनाथ खडसेंच्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. (Eknath Khadse Road Show Live Update)

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

Eknath Khadse | त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.