कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून बसत नाही, खडसेंच्या वक्तव्यानं खळबळ

जळगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पक्षाअंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. खडसेंच्या नव्या विधानाने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कुणीच एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरुपी तिथे राहत नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दिपनगर इथं लेवा समाजाच्या […]

कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून बसत नाही, खडसेंच्या वक्तव्यानं खळबळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

जळगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पक्षाअंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. खडसेंच्या नव्या विधानाने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कुणीच एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरुपी तिथे राहत नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दिपनगर इथं लेवा समाजाच्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी खडसे यांनी हे विधान केलं.

एकनाथ खडसे नेमके काय म्हणाले?

काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन उल्हास पाटील यांनी यावेळी केलं. त्याला उत्तर देत खडसेंनी पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देण्याचं सूतोवाच केलं आहे. कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून बसत नाही, अन्याय झाला तेव्हा वेळीच त्याचा प्रतिकार देखील करायला हवा, तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते, असाही टोला खडसे यांनी यावेळी लगवला.

एकनाथ खडसे यांची नाराजी

भाजपच्या वाढीसाठी राज्याती सुमारे तीस-चाळीस वर्षे राबणाऱ्या भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सत्ता येताच, सत्तेपासून दूर ठेवल्याची भावना त्यांच्या समर्थकांची आहे. भोसरी जमीन प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असल्याचे कारण देत, त्यांना मंत्रिपदावरुन बाजूला करण्यात आले आणि गेली काही वर्षे ते मंत्रिपदापासून दूर आहेत. या काळात एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा तर त्यांनी अप्रत्यक्षपणे थेट भाजपच्या राज्य नेतृत्त्वारही निशाणा साधला आहे. विरोधकांशी जवळीक असो वा विरोधकांच्या व्यासपीठावर जाहीरपणे उपस्थिती असो, एकनाथ खडसे यांची नाराजी कधीच लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आजच्या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

कोण आहेत एकनाथ खडसे?

एकनाथराव गणपतराव खडसे अर्थात महाराष्ट्राला परिचित असलेले ‘नाथाभाऊ’ म्हणजे राजकारणातील दिलदार नि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व. विरोधकांशीही आदराने वागणारा नेता म्हणून ते राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत. राज्य भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे हे खान्देशातील भाजपचे आधारस्तंभ आहेत.

प्रमुख विरोधी पक्षनेता, राज्यमंत्री, मंत्री अशी महत्त्वाची पदं भूषवलेले एकनाथ खडसे सध्या गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे पदावरुन बाजूला आहेत. 2014 साली राज्यात भाजपप्रणित एनडीएचं सरकार आल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे महसूलमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, काही महिन्यातच त्यांच्यावर पुण्यातील भोसरी जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला आणि त्यांना पदावरुन बाजूला करुन चौकशी सुरु करण्यात आली.

खडसेंची राजकीय वाटचाल

एकनाथ खडसे यांचा राजकारणातील प्रवास सरपंचपदापासून झाला. 1987 साली ते जळगावातील कोठली गावचे सरपंच होते. त्यानंतर पुढे राजकारणात त्यांचा विजयरथ कुणीच रोखू शकला नाही. 1989 साली ते मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. पुढे मुक्ताईनगर म्हणजे एकनाथ खडसे असे समीकरणच बनले.

1995-1999 या काळात शिवसेना-भाजप युती सरकार होतं. त्यावेळी एकनाथ खडसे हे अर्थ आणि जलसिंचन अशा दोन खात्यांचे मंत्री होते. सलग सहावेळा आमदार होण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर असून, 2009 ते 2014 या काळात खडसे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

खडसेंनी भूषवलेली महत्त्वाची पदं

  • उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री (जून 1995 ते सप्टेंबर 1995)
  • अर्थ आणि नियोजन मंत्री (सप्टेंबर 1995 ते जून 1997)
  • जलसिंचन मंत्री (जून 1997 ते ऑक्टोबर 1999)
  • विधानसभेचे विरोधी पक्षनेते (नोव्हेंबर 2009 ते ऑगस्ट 2014)
  • महसूल, कृषी आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री (ऑक्टोबर 2014 ते जून 2016)
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.