2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले, सेनेने भाजपला अंधारात ठेवलं नाही, सेनेच्या काँग्रेस प्रस्तावावर खडसेंची रोखठोक भूमिका

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले, सेनेने भाजपला अंधारात ठेवलं नाही, सेनेच्या काँग्रेस प्रस्तावावर खडसेंची रोखठोक भूमिका
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 12:01 PM

उस्मानाबाद : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ (Eknath Khadse on Shiv sena proposal to congress) उडाली आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते शिवसेनेकडे उत्तर मागत आहेत. मात्र भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “2014 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यामुळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शिवसेनेला होते. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही”, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse on Shiv sena proposal to congress) म्हणाले.

अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर, एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीकडे याबाबत प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसे म्हणाले, “भाजप आणि शिवसेना 2014 मध्ये स्वतंत्र लढले होते, युती नव्हती. एकट्याच्या बळावर त्यावेळी भाजपने निवडणुका लढवल्या होत्या. स्वाभाविकपणे भाजपचं एकट्याच्या जीवावर सरकार होतंय असं दिसताना, अन्य पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया केली असावी. त्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. सरकार मिळवण्यासाठी किंवा सरकारमध्ये येण्यासाठी असे विविध प्रयोग यापूर्वीही करण्यात आले होते. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य जबाबदार आहे. त्यामध्ये तथ्य असेल. 2019 मध्ये आम्ही युती म्हणून एकत्र लढलो. तरीही काही मतभेद असल्यामुळे, टोकाचे मतभेद झाल्याने, सरकार टिकू शकलं नाही. त्यामुळे आजचं महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं”

“आज एकमेकांच्या विरोधात तत्व आणि विचार असताना भाजपविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार 2014 मध्येही झाला असावा. त्यामुळेच प्रयत्न झालेच असतील. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही कारण दोन्ही पक्ष 2014 मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला होते. 2019 मध्ये आम्ही एकत्र लढूनही टोकाचे मतभेद झाल्या, त्यामुळे आजचं सरकार स्थापन झाले आहे, भाजपचं सरकार स्थापन झालं नाही”, असं खडसेंनी नमूद केलं.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“शिवसेनेकडून 2014 मध्येही सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसने नकार दिल्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही”, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी  ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

“भाजपने 2014 साली अल्प मतांवर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून आघाडीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी प्रस्ताव आला होता. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी काँग्रेसला कमी जागांवर यश आले होते. त्यामुळे आम्ही विरोधात बसणार हे निश्चित होते. राजकारणात जय-पराजय होत असतात”, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

संबंधित बातम्या  

2014 मध्येही शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा प्रस्ताव होता, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट   

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला वडेट्टीवारांची पुष्टी, पण…  

दिवसा आमची सोबत, रात्री काँग्रेसशी चर्चा, मुनगंटीवारांचा सेनेवर हल्ला, फडणवीस म्हणाले, उत्तर द्या! 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.