देवेंद्र फडणवीस यांची प्रवृत्ती ‘हम करे शो कायदा; खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्ला

माझा भाजपला विरोध नव्हता. भाजपमधील वाईट प्रवृत्तींविरोधात मी लढा दिला, असा अशी टीका एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता केली.

देवेंद्र फडणवीस यांची प्रवृत्ती 'हम करे शो कायदा; खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्ला
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 2:00 PM

जळगाव: राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच मुक्ताईनगरात आले असून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. गावात येताच खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. माझा भाजपला विरोध नव्हता. भाजपमधील वाईट प्रवृत्तींविरोधात मी लढा दिला. एका व्यक्तिमुळे आपलं नुकसान झालं असं सांगतानाच फडणवीस यांची प्रवृत्ती हम करे सो कायदा अशीच असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली. (eknath khadse slams devendra fadnavis)

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच जळगावात आले. त्यानंतर आज ते पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मुक्ताईनगरात पोहोचले. यावेळी त्यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच नाथाभाऊ जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. त्यानंतर नाथाभाऊंना गुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच रिघ लागली. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत करत खडसे यांनी त्यांच्या घराकडे मार्गक्रमण केलं.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. फडणवीसांची प्रवृत्ती हम करे सो कायदाच होती. त्यांनी स्वत:चे निर्णय लादण्याचं काम पक्षात केलं. सामूहिक निर्णय प्रक्रियेला तिलांजली दिली, अशी टीकाही त्यांनी केली. मी भाजपमध्ये थांबलो असतो तर माझं नुकसाना झालं नसतं. पण आपल्या परिसराचा विकास झाला नसता. गेल्या पाच वर्षात आपलं सरकार असतानाही आपल्या भागाला काहीच मिळालं नाही, असं सांगतानाच कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलो. प्रसारमाध्यमांचा सर्व्हेही मी पक्ष सोडावा असं सांगत होते. याचा अर्थ कार्यकर्त्यांमध्ये चीड होती हेच सिद्ध होतं. शिवाय नाथाभाऊ तुम्ही भाजप का सोडत नाही? तुमचं काही अडलं आहे का? असा सवालही मला कार्यकर्ते करत होते. त्यामुळे अखेर मी पक्ष सोडला, असं ते म्हणाले.

भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी ही कार्यकर्त्यांची भावना होती. मी भाजपला सोडल्यानंतर त्यांना आनंद झाला. त्याचाच उत्सव आज दिसत आहे. आज खऱ्या अर्थाने माझं सीमोल्लंघन झालं आहे, असं सांगतानाच माझा भाजपला विरोध नाही. भाजपमधील वाईट प्रवृत्तीविरोधात मी लढा दिला, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली.

मंत्रिपदावरून का काढलं सांगितलं नाही

मला मंत्रिदावरून का काढलं हे ते अजूनही सांगू शकले नाही. कारण काय होतं ते त्यांना सांगता आलं नाही, असं सांगतानाच पदं येतील आणि जातील. पण झालेला अपमान भरून काढता येणार नाही, असंही ते म्हणाले. (eknath khadse slams devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

भाजप खासदार असलेल्या सुनबाईंनी केलं राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सडेतोड उत्तर देतील: अरविंद सावंत

RSS Vijayadashami Utsav | कोरोनामुळे संपूर्ण समाज एकरुप झाला

(eknath khadse slams devendra fadnavis)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.