‘फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा’, खडसेंचा घणाघात, महाजनांवरही बरसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधलेला. फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा, असं खडसे म्हणाले आहेत. त्यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा', खडसेंचा घणाघात, महाजनांवरही बरसले
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 7:01 PM

किशोरी पाटील, Tv9 मराठी, 22 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे. “मराठा आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांचा तो शब्द पाळावा. सरकारचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांनीही मराठा समाजाला आरक्षणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. आरक्षणासाठी वारंवार मराठा समाजाला अशा पद्धतीची खेळवत राहणं ही सरकारची भूमिका योग्य नाही. टिकणार आणि कायदेशीर चौकटीत बसणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळायला पाहिजे , अशी अपेक्षा आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

मराठा समाजाच आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुढाकार घ्यावा, असं वक्तव्य करत एकनाथ खडसेंनी महाजन यांच्यावर टीका केली होती. याच टीकेवर उत्तर देतांना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार उत्तर दिलं. खडसे आजारपणाचं नाटक करत आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे खडसेंवर योग्य वेळेत उपचार

एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचा धक्का आला होता. त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं होतं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केल्यामुळे खसडेंना एअर अॅम्ब्युलन्स मिळाली होती. त्यामुळे खडसेंवर वेळेवर उपचार झाले होते. खसडे बरे झाल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यांच्या फोनवरील संभाषणाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावेळी खडसेंनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते. खडसेंच्या आजारपणावर गिरीश महाजन यांनी टीका केलीय.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“एकनाथ खडसे यांना म्हणा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. सगळे प्रश्न आपोआप सुटतील. 137 कोटींची नोटीस आल्यावर एकीकडे ढोंग करायचे सोंग करायचे, काही झालं नसतांना दवाखान्यात जावून बसायचं, नुसती नोटीस आल्यामुळे कोर्टाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी आजारपणाचे नाटक केलं. आमचं सरकार, आमचे नेते सर्व सांभाळायला समर्थ आहेत, तुम्ही तुमच्या तब्येची काळजी घ्या”, असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.