भाजपचा हात सोडताच खडसेंचं ट्विटरवर नवं रुप, नाव आणि कव्हरपेजही बदललं

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरील भाजपचं कव्हरपेजही बदललं आहे.

भाजपचा हात सोडताच खडसेंचं ट्विटरवर नवं रुप, नाव आणि कव्हरपेजही बदललं
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 4:52 PM

जळगाव : माजी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या (Eknath Khadse Twitter Handel) ट्विटर हँडलवरील भाजपचं कव्हरपेजही बदललं आहे. कमळाच्या चिन्हासह स्वत:चा फोटो असलेलं त्यांच्या अकाऊंटवरील कव्हर खडसे यांनी बदललं आहे. त्याऐवजी त्यांनी आता फक्त त्यांचा फोटो आणि त्यांनी भूषविलेल्या पदांचं नवं कव्हर त्यांच्या अकाऊंटवर ठेवलं आहे (Eknath Khadse Twitter Handel).

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे हे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खडसेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुनही भाजपला हटवलं. त्यांनी त्यांचं नावही बदललं. आधी त्यांच्या ट्विटर हँडलचं नाव @EknathKhadseBJP होतं. पण राजीनाम्यानंतर त्यांनी आता अकाऊंटचं नाव बदलून @EknathGKhadse एवढंच ठेवलं आहे. याशिवाय त्यांनी ट्विटर हँडलवरील भाजपचं कव्हरपेजही बदललं आहे. कमळाच्या चिन्हासह स्वत:चा फोटो असलेलं त्यांच्या अकाऊंटवरील कव्हर बदलत त्यांनी त्यांचा फोटो आणि त्यांनी भूषविलेल्या पदांचं नवं कव्हरपेज ठेवलं आहे (Eknath Khadse Twitter Handel).

मोदींवर टीका करणारं ट्विट खडसेंनी रिट्विट करुन डिलीट का केलं?

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलेलं ट्विट भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी रिट्विट करुन पुन्हा डिलिट केलं होतं. त्यावर खुद्द खडसे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकेचं ट्विट डिलिट केल्याची माहिती दिली. “माझ्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड दोघा-तिघांकडे आहे. त्यामुळे कुणी तरी चुकून ते रिट्विट केलं. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मी हे ट्विट डिलिट केलं”, असं खडसे म्हणाले.

काय होतं ट्विट?

आजच्या भाषणात पंतप्रधान काही तरी नवीन सांगतील. कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील, असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही, असे ट्विट करत मंत्री जयंत पाटील यांनी केलं होतं.

Eknath Khadse Twitter Handel

संबंधित बातम्या :

खडसे समर्थकांचे सामूहिक राजीनामे, मुक्ताईनगरमध्ये दिवाळीपूर्वीच आतषबाजी

Raksha Khadse | एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी : रावसाहेब दानवे

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.