नवी मुंबईतील 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट मिळणार, सिडकोने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची एकनाथ शिंदेंची सूचना

नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यन्तच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देणाची तयारी त्यांनी दर्शवली. यासाठी नवी मुंबई मनपाने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याबद्दल नक्की सकारात्मक विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी आज नवी मुंबईतील सिडको प्राधिकरणाद्वारे सुरू असलेल्या अनेक विकासकामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

नवी मुंबईतील 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट मिळणार, सिडकोने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची एकनाथ शिंदेंची सूचना
एकनाथ शिंदेंकडून नवी मुंबईतील प्रकल्पांची पाहणी
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 8:34 PM

ठाणे : नवी मुंबईतील (Navi Mumbai) सिडको आरक्षित भूखंडावरील आरक्षणांची पुन्हा छाननी करून त्यानंतरच आरक्षण हटवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचा पुनरुच्चार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. तोपर्यंत याआधी नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यन्तच्या घरांना मालमत्ता करातून (Property Tax) सवलत देणाची तयारी त्यांनी दर्शवली. यासाठी नवी मुंबई मनपाने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याबद्दल नक्की सकारात्मक विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी आज नवी मुंबईतील सिडको प्राधिकरणाद्वारे सुरू असलेल्या अनेक विकासकामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी नगरविकास मंत्र्यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन नवी मुंबई मेट्रो, नेरुळ व बेलापूर जेट्टीसह इतर प्रकल्पांना भेटी दिल्या. सिडकोच्या वतीने सुरू असलेले प्रकल्पांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी त्यानी भाऊचा धक्का ते नेरूळ जेट्टी दरम्यान बोटीने प्रवास करून शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नेरूळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जेट्टीची पाहणी केली. त्याच ठिकाणी त्यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावाही घेतला.

यावेळी खासदार राजन विचारे, विजय नहाटा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एस. एस. पाटील यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदेंसमोर सिडकोच्या प्रकल्पांचे सादरीकरण

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सिडकोच्या वतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच सिडकोच्या आवास योजनेतील घरांचे बांधकाम, प्रस्तावित नावडे येथील टाऊनशिप, नवी मुंबई विमानतळ, नैना विकास आराखडा, नेरुळ जलवाहतूक टर्मिनल, नेरूळ –बेलापूर-खारघर सागरी मार्ग, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी पुर्नप्रक्रिया, खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, वाशी येथील ठाणे खाडीपूल, पालघरमधील प्रशासकीय इमारती आदी प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

सिडको प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार

नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले की, देशातील सर्वात उत्कृष्ट अशा इमारती सिडकोने पालघर मुख्यालयाच्या रुपाने उभारल्या आहेत. पालघरप्रमाणेच नवी मुंबईतील प्रकल्पांची कामे दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. सिडकोच्या वतीने उभारण्यात आलेल्या व पुढील काळात उभारण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर सरकत्या जिन्याची सोय करण्यात यावी. सिडकोच्या विविध प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबईचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

नेरुळ येथील जेट्टीच्या पाहणीनंतर पालकमंत्री शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी बेलापूर येथील जेट्टीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी खारघरमधील सेंट्रल पार्क मेट्रो स्थानक येथे भेट देऊन मेट्रोची पाहणी केली. तसेच सेंट्रल पार्क मेट्रो स्थानक ते पेणधर मेट्रोस्थानक असा प्रवासही त्यांनी मेट्रोमधून केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. नवी मुंबईतील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या 4 स्थानकांची पाहणी करून रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाल्यास लवकरात लवकर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या मेट्रो मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दोन डेडलाईन यापूर्वीच उलटल्या असल्याने आता या कामाची गती वाढवण्याची सुचना त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शिंदे यांनी खारघर येथे सुरू असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटरच्या प्रकल्पास भेट दिली.

इतर बातम्या :

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आदित्यने माझा ताण कमी केला’, तर भाजप नेते म्हणतात ‘तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला’!

Mumbai corona update : कहर सुरुच! मुंबईत पुन्हा 8000 पेक्षा जास्त रुग्णांची भर, आजची रुग्णवाढ किती? वाचा सविस्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.