मुंबई : विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच हायजॅक केलीये. गेल्या काही तासांपासून शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पाहिला मिळते. रात्री उशीरा शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली होती. त्याच बैठकीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 29 आमदार गैरहजर होते. या सर्व आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाकडून सातत्याने संपर्क केला जातोय. मात्र, सर्वांचेच फोन नॉट रिचेबल आहेत. यामुळेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. शिवसेनेनी खासदारांना देखील मुंबईमध्ये (Mumbai) दाखल होण्याच्या सूचना दिल्यायेत.
1. एकनाथ शिंदे (मुंबई)
2. शंभूराज देसाई (सातारा)
3. अब्दुल सत्तार (सिल्लोड-औरंगाबाद)
4. संदीपान भुमरे (पैठण-औरंगाबाद)
5. भरत गोगावले (महाड-रायगड)
6. महेंद्र दळवी
7. संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
8. विश्वनाथ भोईर (ठाणे-पश्चिम)
9. बालाजी केणीकर
10. किमा दाबा पाटील
11. तानाजी सावंत (परंडा-उस्मानाबाद)
12. महेश शिंदे (कोरेगाव-सातारा)
13. थोरवे
14. शहाजी पाटील (सांगोला, सोलापूर)
15. प्रकाश आबिटकर (राधापुरी-कोल्हापूर)
16. स्वप्निल बाबर (सांगली)
17. किशोर अप्पा पाटील
18. संजय रायमुलकर (मेहकर-बुलडाणा)
19. संजय गायकवाड (बुलडाणा)
20. शांताराम मोरे
21. लता सोनवणे
22. श्रीनिवास वणगा
23. प्रकाश सुर्वे
24. ज्ञानराज चौगुले (उमरगा-उस्मानाबाद)
25. प्रताप सरनाईक
26. यामिनी जाधव
27. उदयसिंह रजपूत (कन्नड-औरंगाबाद)
28 नितीन देशमुख (अकोला)
29 संजय राठोड (दिग्रस-यवतमाळ)