VIDEO | झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, एकनाथ शिंदे मुंबईत, एअरपोर्ट ते सागर बंगला, कडेकोट बंदोबस्त, 30 गाड्यांचा ताफा!

एकनाथ शिंदे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले असून या दोघांमध्ये तेथे काही महत्त्वाची चर्चा होईल. यानंतर दोघेही राजभवनाच्या दिशेने जातील.

VIDEO | झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, एकनाथ शिंदे मुंबईत, एअरपोर्ट ते सागर बंगला, कडेकोट बंदोबस्त, 30 गाड्यांचा ताफा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 3:22 PM

मुंबईः महाराष्ट्रातील सत्तांतराचं महानाट्य घडवून आणणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तब्बल दहा दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. विधान परिषद निकालानंतर 20 जून रोजी महाराष्ट्रातून सूरत आणि नंतर गुवाहटीत थांबलेल्या एकनाथ शिंदे आणि आमदारांनी आज मुंबई गाठली. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे यांचं आगमन झालं. विशेष म्हणजे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते आले होते. भाजपचे आशिष कुलकर्णी, आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंचं स्वागत केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले. महाराष्ट्रात केंद्र सरकारतर्फे एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे मुंबई विमानतळ ते सागर बंगल्यापर्यंत त्यांच्या गाडीला देण्यात आलेली सुरक्षा हाच मोठा चर्चेचा विषय ठरला.

झेड प्लस सुरक्षा

मुंबई विमानतळावरून निघाल्यावर एकनाथ शिंदे यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. राज्य सरकारतर्फेही येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल दहा दिवसानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आल्यामुळे शिंदे समर्थकांचीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळली होती. कार्यकर्त्यांनी मोठ्याने घोषणाबाजी सुरु केली. त्यांना भेटण्यासाठी समर्थक पुढे जात होते. मात्र पोलिसांची एक मोठी फौज जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे तैनात करण्यात आली होती. शिंदे यांच्या गाडीच्या मागे पुढेही अनेक गाड्यांचा ताफा देण्यात आला. या गाड्यांची संख्यात जवळपास 30 असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटाला धमक्या दिल्या होत्या. महाराष्ट्रात येऊन दाखवा, असे इशारेही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आणि एकूणच महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा प्रमुख मोहरा असल्यानं एकनाथ शिंदे यांना एवढी मोठी सुरक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं पुरवण्यात आली . एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा ताफा ज्या ज्या रस्त्यावरून जातील, त्या रस्त्यावरील प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फडणवीस-शिंदेंचा आजच शपथविधी?

एकनाथ शिंदे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले असून या दोघांमध्ये तेथे काही महत्त्वाची चर्चा होईल. यानंतर दोघेही राजभवनाच्या दिशेने जातील. तेथे राज्यपाल भगसिंह कोळ्यारी यांची भेट घेतील. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सत्ता स्थापनेचा दावा दुपारी साडेतीन वाजता केला जाऊ शकतो. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतील आणि महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेविषयी माहिती उघड करतील. दरम्यान शिंदे आणि फडवणवीस यांचा आजच शपथविधी असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.