VIDEO | एकनाथ शिंदे अधिवेशनात, पदवीदान सोहळा नाशकात, व्हर्च्युअल रिअॅलिटीने उपस्थिती
व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञान वापरुन एकनाथ शिंदे पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहिले (Eknath Shinde Virtual Reality Convocation)
नाशिक : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात आली. व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या (Virtual Reality) माध्यमातून एकनाथ शिंदेंचा पदवीदान सोहळा पार पडला. विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित असलेले एकनाथ शिंदे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाशकातील सोहळ्याला हजर राहिले. (Eknath Shinde attends via Virtual Reality Yashwantrao Chavan Open University Graduate Convocation Ceremony)
एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए परीक्षा उत्तीर्ण केली. बुधवारी त्याचा पदवीदान सोहळा पार पडला. व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञान वापरुन पदवीदान सोहळा झाला. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाही एकनाथ शिंदे व्हर्च्युअल पद्धतीने पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहिले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग झाला.
पाहा व्हिडीओ :
शिक्षणाला वयाचं बंधन नाही
शिक्षणासाठी वयाची अट नसते हे आपण नेहमीच अनुभवत आलो आहोत. वयाची सत्तरी गाठल्यानंतरही अनेकांनी महाविद्यालयीन परीक्षा पास केल्याची उदाहरणेही आपण ऐकून आहोत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवले.
शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. वयाच्या 56 व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.
खासदार लेक डॉक्टर, मंत्री वडील पदवीधर
सगळ्यांनाच आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाले. पण माझं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. मनात शिक्षणाची जिद्द होती. तळमळ होती. शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचंच अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि जसा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि बीए पास झालो, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या होत्या. (Eknath Shinde attends via Virtual Reality Yashwantrao Chavan Open University Graduate Convocation Ceremony)
एकनाथ शिंदे यांची कारकीर्द
एकनाथ शिंदे यांनी याआधी 2015 ते 2019 या काळात सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019 च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते 1980 च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.
संबंधित बातम्या :
एकनाथ शिंदे अखेर ग्रॅज्युएट; पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण
(Eknath Shinde attends via Virtual Reality Yashwantrao Chavan Open University Graduate Convocation Ceremony)