Tv9 स्पेशल रिपोर्ट : ठाकरेंचा आमदार फोडण्याचा प्लॅन शिंदेंनी अयशस्वी केला?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. असं असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत वेगळाच दावा केला आहे.

Tv9 स्पेशल रिपोर्ट : ठाकरेंचा आमदार फोडण्याचा प्लॅन शिंदेंनी अयशस्वी केला?
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 10:58 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेना पक्षात दोन गट पडले. शिवसेनेत या बंडापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दावा केला. “उद्धव ठाकरेंचाच भाजपला फोडून 25-30 आमदार आपल्याकडे घेण्याचा प्लॅन होता. हे स्वत: उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितलं होतं. मात्र आपण तसं होऊ दिलं नाही. नाही तर माझा प्लॅन फेल झाला असता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीरपणे ठाण्यात म्हणाले. “ठाकरेंचा भाजप फोडण्याचा प्लॅन होता, मी म्हटलं माझा प्लॅन फेल होईल”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. म्हणजेच बंडाची तयारी, वर्षभरापासूनच सुरु होती, हेच मुख्यमंत्री शिंदेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय.

ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. शिंदेंनी म्हस्केंसाठी ठाण्यात सभा घेतली. त्यातून उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. आनंद दिघे असताना ठाणे पालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विचारेंनी दिला नसता तर हे भूतच जन्माला आलं नसतं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यांच्या या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आत्मचरित्रावर आधारीत धर्मवीर चित्रपटातील राजन विचारे यांच्या सीनवर मोठं भाष्य केलं.

एकनाथ शिंदे यांचा दावा काय?

धर्मवीर चित्रपटात, आनंद दिघेंच्या सांगण्यावरुन एकनाथ शिंदेंसाठी विचारे स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात, हेच दाखवण्यात आलंय. हा चित्रपट शिंदेंनीच शिवसेना फुटीच्या आधी काढला. मात्र, त्यात चुकीचं दाखवण्यात आलं असून धर्मवीर पार्ट टू मध्ये सत्यता दिसेल असं शिंदेंच म्हणाले आहेत. त्याचवेळी दिघेंना उद्धव ठाकरेंनी कसा त्रास दिला? यावरुनही शिंदेंनी आरोप केले आहेत.

ठाणे लोकसभेची जागा शिंदेंसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठीही प्रतिष्ठेची आहे. राजन विचारे विद्यमान खासदार असून ते ठाकरेंसोबत आहेत. त्यातच आता प्रचारात आनंद दिघेंवरुन शिंदेंनी गौप्यस्फोट करणं सुरु केले आहेत. दरम्यान, आनंद दिघे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोठे दावे केले आहेत. “आनंद दिघे यांच्या निधननंतर आता तुम्ही काहीही बोलू शकतात. गणपतीचा दिवस होता. मला मिलिंद नार्वेकरचा फोन आला होता. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला बोलवलं आहे. आनंदचा मृत्यू झालेला आहे. कोणाला काहीच माहीत नव्हतं. शरद पवार यांना मी सांगितलं, अशी बातमी आहे. साधारण लोक किती आहेत? त्यांनी विचारलं. लगेच गाडीत बस आणि निघ तिथून आणि त्यानंतर दंगल सुरू झाली. त्यामुळे खोटारडेपणाला लिमिट असते. या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. सहानुभूती एखाद्याच्या नावाने मिळवायची ते किती मिळवायची याचं वास्तव जाणणारी लोक आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.