Eknath Shinde Exclusive Call Recording : भास्कर जाधव एकनाथ शिंदेच्या संपर्कात? खुद्द एकनाथ शिंदेंनी उलगडला राज

Eknath Shinde : शुक्रवारी सकाळपासूनच भास्कर जाधव हे देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली होती.

Eknath Shinde Exclusive Call Recording : भास्कर जाधव एकनाथ शिंदेच्या संपर्कात? खुद्द एकनाथ शिंदेंनी उलगडला राज
पाहा काय म्हणाले?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 8:45 AM

गुवाहाटी : शिवसेना फोडल्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी आपल्याकडे शिवसेनेच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालांना पाठवलंय. त्यांच्याकडे असलेल्या आमदारांचा वाढता पाठिंबा पाहता चर्चांना उधाण आलंय. तर दुसरीकडे आता कोकणातील आणखी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे देखील त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde vs Shiv sena) यांना टीव्ही 9चे प्रतिनिधी मयुरेश गणपत्ये यांनी विचारपूस केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. भास्कर जाधव तुमच्या संपर्कात आहेत, ते देखील तुमच्या गटात सामील होणार आहेत, असं सांगितलं जातंय, या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय, की भास्कर जाधव यांच्याशी माझं कोणतंही बोलणं झालेलं नाही. भास्कर जाधव यांचं मला काही माहीत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. टीव्ही 9च्या प्रतिनिधींना एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता, त्यांनी ही माहिती दिली.

पुढची रणनिती काय?

शुक्रवारी सकाळपासूनच भास्कर जाधव हे देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम लावलं आहे. अजूनतरी एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतंही बोलणं झालेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे आता पुढील रणनिती एकनाथ शिंदे गटाची काय असेल, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. याबाबत आज एकनाथ शिंदे आज बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

संजय राऊत यांनी दिलेल्या अल्टिमेटमला एकनाथ शिंदे गटाने केराची टोपली दाखवली आहे. महाविकास आघाडीतून आधी बाहेर पडा, मग विचार करुन, असं प्रत्युत्तर शिंदे गटाकडून राऊतांना देण्यात आलेलं होतं. तर राऊतांनी बहुतांश आमदारांना फसवून नेण्यात आल्याचा दावा केलाय. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांनी तर रात्री 37 आमदारांच्या सही पत्रच राज्यपालांसह विधानसभा सचिव आमि उपाध्यक्षांना पाठवल्यानं आता चर्चांना उधाण आलंय.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रवर सद्या असलेले ते 37 आमदार कोण आहेत, यावरही एक नजर टाका

  1. एकनाथ शिंदे
  2. भरत गोगावले
  3. विश्वनाथ भोईर
  4. महेंद्र थोरवे
  5. शांताराम मोरे
  6. श्रीनिवास वनगा
  7. लता सोनवणे
  8. संजय शिरसाट
  9. ज्ञानराज चौगुले
  10. यामिनी जाधव
  11. शहाजी पाटील
  12. तानाजी सावंत
  13. शंभूराज देसाई
  14. महेश शिंदे
  15. प्रकाश सुर्वे
  16. संजय रायमुलकर
  17. महेंद्र दळवी
  18. संदीपान भुमरे
  19. रमेश बोरनारे
  20. बालाजी प्र किणीकर
  21. अब्दुल सत्तार
  22. प्रदीप जैस्वाल
  23. संजय गायकवाड
  24. चिमणराव पाटील
  25. अनिल बाबर
  26. सुहास कांदे
  27. प्रताप सरनाईक
  28. बालाजी कल्याणकर
  29. किशोर पाटील
  30. योगेश कदम
  31. दीपक केसरकर
  32. मंगेश कुडाळकर
  33. गुलाबराव पाटील
  34. सदा सरवणकर
  35. प्रकाश आविटकर
  36. दादा भुसे
  37. संजय राठोड

पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

वाचा एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या लाईव्ह घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.