CMOMaharashtra अधिकृत फेसबुक हँडलला अपडेटचा दुष्काळ, शेवटचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंचा, शिंदेंनी फक्त फोटोच बदलला
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपल्यासोबत जवळपास 40 आमदार घेतले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यादरम्यान अनेक मोठ्या घडामोडी देखील घडल्या. आता एकनाथ शिंदेंच्या फेसबुक पेजवरून वेगळीच चर्चा रंगताना दिसते आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटामध्ये सध्या शिवसेनेच्या वर्चस्वावरून वाद सुरूयं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तसं पत्रंही दिलं आहे. एकंदरीतच काय तर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात जोरदार सत्ता संघर्ष बघायला मिळालायं. शिंदेंच्या बंडखोरीत थेट राज्यातील महाविकास आघाडी सरकारच कोसळले. राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार आहे. सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झालेयंत. मात्र, कुरघोडीचे राजकारण (Politics) अजूनही पाहिला मिळतंय. आता यादरम्यान एक वेगळीच चर्चा रंगलीयं, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या CMOMaharashtra अधिकृत फेसबूक पेजची.
एक महिन्यांपासून CMOMaharashtra अधिकृत फेसबुक अपडेट नाही
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपल्यासोबत जवळपास 40 आमदार घेतले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यादरम्यान अनेक मोठ्या घडामोडी देखील घडल्या. आता एकनाथ शिंदेंच्या फेसबुक पेजवरून वेगळीच चर्चा रंगताना दिसते आहे. त्यांचे झाले असे की, CMOMaharashtra अधिकृत फेसबुक हँडलवर गेल्या महिनाभरात एकही पोस्ट करण्यात आलेली नाहीयं. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी फक्त फोटोच बदलला आहे. याही गोष्टीला एक महिना उलटून जात आहे. CMOMaharashtraअधिकृत फेसबुक पेजवर शेवटचा व्हिडीओ हा उद्धव ठाकरेंचाच आहे. यामुळेच मोठे आर्श्चय व्यक्त केले जातंय. उद्धव ठाकरे यांचा 29 जूनला शेवटा व्हिडीओ या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलायं.
आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा शेवटचा व्हिडीओ पेजवरून शेअर
आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर CMOMaharashtra या अधिकृत फेसबुक पेजवरून शेवटचा व्हिडीओ अपलोड करण्यात आलायं. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मला कधीही मुख्यमंत्री पदाची लालसा नव्हती. माझ्याच जवळच्या लोकांनी मला धोका दिलायं. तसेच मी वर्षा निवासस्थान त्याच दिवशी सोडले आहे. बंडखोर आमदारांनी समोर येऊन चर्चा करायला हवी. आता राज्यात सत्ता स्थापन होऊनही बरीच दिवस झाली आहेत. मात्र, अघ्यापही एक महिना होऊन हे पेज अपडेट नसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.